पूर्वी लोक म्हणायचे आम्हाला कोंबड्याने बांग दिली जाग येते. कोंबड्याची बांग देण्याचा वेळ म्हणजे ब्राह्ममुहूर्त! पूर्वी लोकांकडे घड्याळ्याची किंवा अलार्मची सोय नसायची त्यामुळे लोकांची पहाटेही कोंबड्याने आरवले की व्हायची. अजूनही गावाकडे काही ठिकाणी ही पद्धत अवलंबली जाते. कोंबडा कधीही सूर्योदय होण्यापूर्वीच बांग देतो. त्याची वेळ कधीच पुढे पाठी होत नाही. त्यामुळे सहाजिकच अनेकांना प्रश्न पडतो की वेळ न पाहता कोंबड्याला पहाट झाली हे कसे जाणवते? आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.

कोंबड्याचे आरवणे हे फार मोठ्या आवाजात असते. कोंबड्याने बांग देताच संपूर्ण सृष्टी जणू सूर्याच्या आगमनाची तयारी करत असल्यासारखे भासू लागते. कोंबडा बाग देण्यापूर्वी बाहेर पडतो त्यानंतर आपल्या आजूबाजूची टेहळणी करतो आणि मगच आरवतो. आरवणे हे केवळ कोंबड्याचे काम आहे कोंबडी कधीच बांग देत नाही.

एका कोंबड्याने आरवायला सुरुवात केली की इतर कोंबडे सुद्धा बाहेर पडतात व बांग देऊ लागतात. या दरम्यानच्या काळात त्यांच्यामधील एक शिस्तप्रिय वृत्ती दिसून येते. एका कोंबड्याने आरवणे बंद केले की दुसरा कोंबडा आरावू लागतो. ते कधीच एकत्र बांग देऊन गोंधळ घालत नाही.

सूर्योदयापूर्वी जेव्हा संपूर्ण सृष्टी साखर झोपेत असते त्यावेळी कोंबडा बांग देतो त्यामुळे तेव्हा त्याची बांग देण्याची तीव्रता खूप जास्त असते. कोंबड्याच्या बांगेत खूप जास्त ताकत असते. त्याची तीव्रता १४३ डेसिबल असते. माणूस १३० डेसिबल पेक्षा अधिक आवाज ऐकू शकत नाही नाहीतर तो बहिरा होण्याची शक्यता असते. मात्र कोंबडा कधीही माणसाच्या दूर जाऊन बांग देत असल्यामुळे कोंबड्याच्या आरवण्याने मुळे माणूस बहिरा होत नाही. कोंबडा माणसांना उठवण्यासाठी बांग देतो असा काही जणांचा गैरसमज असतो. पण खरे तर तो त्याच्या परिवारातील इतर सदस्यांना उठवण्यासाठी बांग देत असतो.

चला तर आता मूळ मुद्द्यावर येऊया! कोंबड्याला सूर्योदय होणार आहे हे कसे ठाऊक होते? कोंबड्याच्या आत सिरकेडियन रिंग नावाचा एक सेन्सर असतो. त्याच्या मदतीने काहीवेळातच सूर्योदय होणार असल्याची त्याला जाणीव होते. कोंबड्याचे वय जसे वाढत जाते तसा तो सेन्सर अधिक उत्तम रित्या काम करू लागतो. याच कारणामुळे सर्वाधिक वय असलेला कोंबडा सर्वात पहिला बाहेर येऊन आरवतो आणि सूर्योदय होणार असल्याचे सर्वांना कळवतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *