लग्नात नवरा बायको एकमेकांना सात प्रकारची वचने देतात. यामध्ये पुढील आयुष्यात येणारी सुखदुःखे एकमेकांसोबत वाटण्यापासून ते आपल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे निभावण्याचे वचन त्यात असते. या वचनांचा बाबत अजून एक वचन असते ते म्हणजे नेहमी खरे बोलणे आणि आपल्या जीवनसाथी पासून कुठलीही गोष्ट लपवून न ठेवणे. पण खऱ्या आयुष्यात मात्र काही कारणास्तव पती-पत्नी खोटे बोलतात. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे पत्नीकडून बोलले जाणारे खोटे काय असते ते सांगणार आहोत.

१. महिलांना पैसे बचतीची सवय असते. कित्येकदा त्या त्यांच्या पतीला कळू न देता सेविंग करत असतात. ते पैसे पुढे जाऊन वाईट काळा पासून वाचण्यासाठी वापरतात. तर काही महिला स्वतःला खास गोष्टी खरेदी करण्यासाठी त्या पैशांचा वापर करतात. २. अधिकतर महिला त्यांच्या परिवारात त्यांना असलेल्या आजाराबाबत सुद्धा खोटे बोलतात. घरच्यांना आपली अधिक काळजी वाटू नये यासाठी त्या एखादा मोठा आजार असून देखील छोटा मोठा असल्याचे सांगतात.

३. शॉपिंग करते वेळी काही महिलांकडून एखादी महागडी गोष्ट खरेदी केली जाते. महागडी वस्तू खरेदी केल्यामुळे आपल्याला ओरडा पडेल त्यामुळे पतीला घाबरून काहीजण त्या वस्तूची योग्य किंमत सांगत नाहीत. ४. बऱ्याच महिला त्यांच्या मित्र-मैत्रिणींना आपल्या पतीच्या जॉब,सॅलरी आणि स्टेटस बद्दल खोटे सांगतात.

५. बऱ्याच परिवारात कामातून थोडासा विरंगुळा बाहेर फॅमिली डिनर साठी जाण्याचा प्लान होतो. त्यावेळी एखादा मेन्यू ऑर्डर करतेवेळेस महिला स्वतःच्या आवडीची डिश ऑर्डर करत नाही. त्यावेळी त्या इतरांच्या चॉईस सोबत ऍडजेस्ट करून घेतात. इतरांनी ऑर्डर केलेली डिश जास्त आवडली नाही तर ती कमी खाऊन आपलं पोट भरल्याचा खोटा बहाणा देतात.
६. काही महिलांना त्यांच्या पतीने किंवा एखाद्या जवळील व्यक्तीने दिलेले गिफ्ट आवडले नाही तरीही त्या ते छान आहे असे बोलून ठेवून देतात. त्यांना समोरच्याच्या भावनांना दुखवायचे नसते.

७. एखाद्या महिलेने जरी म्हटले की तिला तिच्या पतीच्या पूर्व आयुष्याबाबत इंटरेस्ट नाही तर ते केवळ तोंडदेखले असते. खरेतर तिला तिच्या पतीच्या आयुष्याबाबत सर्व काही जाणून घेण्याची इच्छा असते. ८. अनेक पत्नींना त्यांच्या पतीचे मित्र आवडत नाही. मात्र जेव्हा त्यांच्या मित्रांच्या गेट-टुगेदर असते त्यावेळी त्या त्यांना वाईट साईट बोलण्यापासून किंवा त्यांना नापसंत करण्यापासून स्वतःला रोखतात.

९. प्रत्येक स्त्री ही तिच्या पतीला किंवा नातेवाईकांना खुश ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खोटे बोलत असते. तिच्या नजरेत प्रत्येक जण खुश असणे हे महत्त्वाचे असते. १०. काही महिला त्यांच्या भूत काळासंबंधी त्यांच्या पतीशी खोटे बोलतात. आपल्या पूर्वाआयुष्यामुळे आपले आताचे नाते बिघडू नये अशी त्यांची इच्छा असते. काही वेळेस पती हे त्यांच्या पत्नीच्या पूर्व आयुष्या बाबत जाणल्यानंतर रागीट किंवा चिडचिड्या स्वभावाचे होतात. या व्यतिरिक्त महिला त्यांना सेक्स चा मुड नसेल, थकवा जाणवत असेल, किंवा तब्येत बिघडली असेल तरी खोटे बोलतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

टीप – या सर्वच गोष्टीमध्ये तथ्यं असेल असे काही नाही परंतु स्त्रिया या भावनिक असतात आणि आपल्या पतीची मर्जी राखण्यासाठी या गोष्टी करतात आणि सर्वच स्त्रियांच्या बाबतीत हे खरे असेल असे आम्ही खात्री देत नाही !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *