बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये रोज वेगवेगळ्या धक्कादायक गोष्टी घडत असतात. गेल्या दोन दिवसांपासून इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती बिझनेस मॅन राज कुंद्रा यांची जोरदार चर्चा सुरू आहे. शिल्पा चे पती राज कुंद्रा यांचे नाव पॉ*र्नो*ग्रा*फी केसमध्ये अडकल्यामुळे त्यांची सतत चर्चा होत आहे. सध्या कोर्टाने राज कुंद्रा यांना २३ जुलैपर्यंत पोलिस क*स्ट*डी सुनावली असून त्यांना भायखळा जे*ल मध्ये शिफ्ट केले आहे.

राज कुंद्रा हे ९ कंपन्यांचे डायरेक्टर आहेत. त्यांचा करोडोंचा कारभार असून ते महागडे गिफ्ट देण्यासाठी ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी त्यांच्या प्रिय पत्नी शिल्पाला करोडो रुपयांचे व्हिला गिफ्ट केले होते. त्यातीलच एक म्हणजे त्यांचा मुंबईतील बंगला जिथे ते सध्या त्यांच्या सहकुटुंबासोबत राहतात. शिल्पा शेट्टीचे मुंबईतील समुद्र किनारी एक विला असावा असे स्वप्न होते जे राज कुंद्रा यांनी पूर्ण केले. शिल्पा मुंबईत पती राज कुंद्रा, मुलगा वियान कुंद्रा आणि मुलगी समिषा सोबत राहते ते घर आतून खूप अलिशान असून सर्व सुख सुविधांनी युक्त असे आहे.

शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्या सी फॅसिंग विला चे नाव किनारा असे आहे जो बाहेरून दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे.
शिल्पा योगासाठी आधीपासूनच खूप प्रसिद्ध आहे. ती योगाचे व्हिडिओ बनवत असते ते तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर सुद्धा पोस्ट करते. वरील फोटो तिच्या गार्डन एरिया मधील असून तिथे ती योगा करताना दिसत आहे. या गार्डन मध्ये गौतम बुद्धांची एक मूर्ती असून ती त्या परिसराची शोभा वाढवत आहे.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे घर राजमहाला पेक्षा कमी नाही. अ*श्ली*ल फिल्म बनवण्याच्या आरोपात फसलेल्या राज कुंद्रा यांची संपत्ती गडगंज आहे. त्यांच्या परिवाराला ते लक्झरी आयुष्य जगण्यास देतात. शिल्पा शेट्टी नेहमी तिच्या घरातील या खास जागेवरून फोटो शेअर करत असते. बसंती कधी चहाचा आस्वाद घेते तर कधी मनसोक्त पुस्तक वाचते.
हा फोटो त्यांच्या घरातील लिविंग एरिया मधील असून या फोटोत दोघांच्या परिवारातील सदस्य दिसत आहेत.
शिल्पा आणि राज यांच्या बंगल्याची किंमत जवळपास शंभर करोड रुपये आहे. त्यांच्या बंगल्यातील लिविंग एरिया खूप अलिशान आहे.

शिल्पाच्या घरात एक मोठे आणि सुंदर असे बार आहे ते पाहून तुम्ही अंदाज बांधू शकता की ते घर आतून किती मोठे असेल. त्यांचे हे घर प्रत्येक कानाकोपऱ्यातून खास आहे. या घरातील इंटेरियर, गार्डन तसेच इतर येरीया सुध्दा खूप विचारपूर्वक आणि खास तयार केला आहे. घरामध्ये लाखो रुपयांचे झुंबर लावले आहेत. योगा सोबतच शिल्पा तिच्या कुकिंग चे व्हिडीओ सुद्धा तयार करत असते. त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही तिचे किचन पाहू शकता किती अलिशान आहे.

राज कुंद्रा यांना अटक झाल्यानंतर त्यांची सर्वतोपरी तपासणी होत आहे. दरम्यान त्यांचे काही चॅट्स पोलिसांच्या हाती लागले आहे त्यावरून राज कुंद्रा हॉट शॉट या पो*र्नो*ग्रा*फी ॲप वरील लाईव्ह मधून दररोज १ लाख ८५ हजार रुपयांची कमाई करत असल्याचे उघड झाले. तर या व्यतिरिक्त या ॲप वरील अ*श्ली*ल व्हिडिओ मधून ते दररोज ४ लाख ५३ हजार रुपयांची कमाई करत होते. म्हणजेच साधारणतः एका मिनिटाला तो ४४३ रुपये कमवत असे. २०२० पर्यंत हॉट शॉट या पो*र्नो*ग्रा*फी ॲपचे २० लाखांहून अधिक सबस्क्रायबर होते. या बिजनेस मधून ते ८ ते १० कोटी रुपयांची उलाढाल करत असल्याचे समोर आले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *