बॉलिवुड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस तिच्या चित्रपटांसोबत तिच्या सौंदर्यासाठीसुद्धा चर्चत असते. तिने तिच्या करियरमध्ये आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. जॅकलिन तिच्या अभिनयाव्यतिरिक्त तिच्या बोल्ड अंदाजासाठी सुद्धा ओळखली जाते. ती सोशल मीडियावर सुद्धा फार अॅक्टीव्ह असते व स्वताचे सुंदर आणि हॉट फोटो शेअर करत असते. काही दिवसांपुर्वीच जॅकलिनने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरशा धुमाकुळ घातला आहे.

जॅकलिनचे हे नवे फोटो बाथरुममध्ये क्लिक केलेले आहेत. शिवाय तिने या फोटोसोबत वाईट नजर ठेवणाऱ्या सोसायटीवर निशाणा साधणारे कॅप्शन सुद्धा दिले आहे. तिने लिहिले आहे कि तुम…….तुम गंदे नही….सोसायटी आहे. यासोबतच तिने #liveyourlifenow हा हॅशटॅगसुद्धा दिला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर अवघ्या काही तासांत व्हायरल झाला.

फोटो व्हायरल होतोच तिच्या चाहत्यांनी फोटोंवर लाइक्स आणि कमेंटस् चा पाऊस पाडला आहे. तिने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या प्रकारच्या पोज देताना दिसते. काही दिवसांपुर्वी जॅकलिनने तिच्या अकाउंटवर टॉपलेस फोटो शेअर केले होते. त्या फोटोंमध्ये जॅकलीन विना कपड्यांची एका ऑरेंज रंगाच्या टॉवेलमध्ये पोज देताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143)


जॅकलिनच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच अक्षय कुमार सोबत बच्चन पांडे या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि जॅकलिन व्यतिरिक्त कृति सेनन, पंकज त्रिपाठी आणि अरशद वारसी सुद्धा महत्वाच्या भुमिकेत दिसणार आहेत. याशिवाय ती रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस या चित्रपटात रणवीर सिंह सोबत दिसणार आहे.

या दोन चित्रपटांसोबत जॅकलिन रामसेतु या चित्रपटात अक्षय कुमार आणि अभिनेत्री नुसरत भरुचा सोबत दिसणार आहे. तर त्यानंतर हॉरर कॉमेडी भुत पोलिस मध्ये सुद्धा जॅकलिन वेगळ्या रुपात अभिनेता अर्जुन कपुर आणि सैफ अलि खान सोबत दिसेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *