सोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी मिळावयचे एकमेव असे हक्काचे प्लॅटफॉर्म झाले आहे. लोक त्यांच्यातील कला येथे सादर करतात आणि काही क्षणात फेमस होतात. शिवाय त्यामुळे काही वेळेस पैसे कमवायची संधी मिळते ते वेगळे. सध्या सोशल मीडियावर अशाचप्रकारे एका गाण्याने धुमाकुळ घातला आहे. त्या गाण्याने अवघ्या चार आठवड्यात लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. प्रेक्षकांकडुनसुद्धा त्या गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

हे गाणे म्हणजे ओ शेठ….तुम्ही नादच केलाय थेट. सध्या या गाण्याला सगळीकडुन उदंड प्रतिसाद मिळत आहे. केवळ चार आठवड्यात या गाण्याला १० मीलियन व्ह्युज् मिळाले. हे गाणे नाशिकच्या संध्या केशे यांनी लिहीले आहे तर उस्मानाबादच्या प्रणिकेत खुरे यांनी गायलं आहे. सोशल मीडियावर हिट होणारं हे गाणं इतक्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं कि प्रेक्षकांनी या गाण्याला अक्षरशा डोक्यावर घेतल. इन्स्टाग्राम रिल्सवर सुद्धा हे गाणे मोठ्याप्रमाणात पाहयला मिळत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातुन काहीतरी नवीन करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. या सोशल मीडियामुळे नवीन गायकांनासुद्धा एक व्यासपीठ मिळाले आहे. या गाण्यामागची कहाणी म्हणजे या गाण्याच्या लेखिका या नाशिकच्या तर गीतकार हे नाशिकचे असल्यामुळे ‘ओ शेठ’ हे गाणे तयार करण्याची प्रोसेस ही चक्क फोनवर झाली होती. लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी या गाण्याला वेगळी चाल लावण्यात आली. या गाण्याच्या लेखिका व गीतकार यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली.त्यावेळी त्यांनी सांगितले कि ओ शेठ … तुम्ही नादच केलाय थेट या ओळी सुचायलाच ८ ते १० दिवसांचा कालावधी लागला होता.

ती ओळ सुचल्यावर पुढील २ तासात हे गाणे लिहुन तयार झाले. हे गाणे व्हायरल झाल्यावर प्रणिकेत आणि संध्याला सर्व महाराष्ट्र भरातुन फोन येऊ लागले. या गाण्याची मागणी त्यांच्याकडे होऊ लागली. सुरुवातीला फक्त ट्रेंडिंग विषय आहे म्हणुन गाणे तयार करण्याचा विचार केला होता पण ते गाणे इतके गाजेल आणि १० मिलीयनच्या पुढे व्हयुज् क्रॉस करेल असे स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते अशा भावना संध्या यांनी व्यक्त केल्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *