बॉलीवूडमधील कलाकार हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असतात, मग ती वैयक्तिक बाब असो वा अभिनयासंबंधित, चांगली असो वा वाईट. तसाच सध्या सोशल मीडियावर हातातील मोबाईलवर चॅट ओपन असलेला फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे. हा फोटो बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या मोबाईलमधील चॅट चा आहे. तर दुसरा फोटो ती मोबाईलवर कोणाशी तरी बोलण्यात खूप दंग असल्याचा हा फोटो आहे.

बॉलीवूडमधील अनेक कलाकार आपल्या जीवनातील काही गोष्टी या खाजगी ठेवतात. त्यापैकी श्रद्धा कपूर एक आहे. शुक्रवारी श्रद्धाला एका चित्रपटाच्या सेट वर पाहिले गेले होते. साध्या निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये देखील ती तितकीच साधी व सुंदर दिसत होती. त्याचवेळेस श्रद्धा आपल्या मोबाईलमध्ये चॅट करण्यात मग्न दिसली. त्याचवेळी तिची चेहऱ्यावर असलेलं छोटंसं हसू हे ती त्या व्यक्तीशी बोलणं अधिक पसंत करत असल्याचे दिसत होते.

तेवढ्यातच तिथे असलेल्या पैपराजीने (ख्यातनाम व्यक्तींची छायाचित्रे घेण्याचा छंद असलेला छायाचित्रकार) तिचे फोटो काढले आणि त्या फोटोमधील वेगळेपण हे की त्यापैकी एक फोटो श्रद्धा कपूरच्या चॅटचा होता. त्या चॅटचा फोटो बघून श्रद्धा कोणातरी खास व्यक्तीसोबत बोलत असल्याचे दिसत होते. त्या व्यक्तीचा नावाने तो नंबर मोबाईलमध्ये सेव न करता तीन हार्ट ईमोजीने सेव केला होता.

त्या चॅटमध्ये श्रद्धा काय बोलत होती ते देखील स्पष्ट दिसत होतं. ती म्हणाली, “मी माझ्या जीवनामध्ये तुझ्या सारख्या व्यक्तीला कधी भेटलीच नाही, काहीही झालं तरी तुम्ही नेहमी माझ्यासोबत होतात.” श्रद्धाच्या या मेसेजवर समोरून उत्तर आलं की “मला आनंद आहे की तू असा विचार करतेस.” यामध्ये श्रद्धा पुढे लिहिते, “तुम्ही एक उत्तम श्रोते आहात, तुम्ही नेहमी मला ग्रेट फील करवता.” तिच्या या बोलण्याचा रिप्लाय, हार्ट ईमोजी मध्ये येतो. इथेच बोलणं थांबत नाही तर श्रद्धा पुढे म्हणते “माझी सर्व स्वप्न आणि इच्छा पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद” समोरून रिप्लाय येतो, “माझे सौभाग्य आहे तुला कुठल्याही गोष्टीची गरज असेल तर मला कळवं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


या चॅटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांच्या यावर प्रतिक्रिया आल्या. काही चाहते पैपराज़ीला कलाकारांच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप केल्याबद्दल ओरडत आहेत. श्रद्धाच्या चाहत्यांनी तर हा फोटो खोटा असल्याचे किंवा तो फोटोशॉप केल्याचे असल्याचे म्हटले आहे. अनेक जण म्हणत आहेत की हा फोटो कुठे आहे कारण स्क्रीनच्या बाजूने हा फोन iphone सारखा वाटत आहे तर मागच्या बाजूने वेगळा मोबाईल असल्याचे दिसत आहे.

श्रद्धा कपूर ही फोटोग्राफर रोहन श्रेष्ठीसोबत फार काळापासून सिरीयस रिलेशनशिपमध्ये आहे. श्रद्धा आणि रोहन यांची लव्ह स्टोरी ओपन सिक्रेट असल्याचे बोलले जाते. फार काळापासून हे दोघे एकत्र आहेत आणि याबद्दल सर्वांनाच माहिती देखील आहे. अनेकदा या दोघांच्या लग्नाच्या बातम्या जोर धरू पाहत असतात. श्रद्धाच्या घरगुती कार्यक्रमांमध्ये देखील रोहनची उपस्थिती पाहायला मिळते. पण अद्याप तरी श्रद्धा किंवा रोहन हे आपल्या नात्याबद्दल कधीही खुलेपणाने बोलले नाहीत. शक्ती कपूर यांनी ते दोघे चांगले मित्र असल्याचे सांगितले. श्रद्धा आणि रोहनच्या नात्याबद्दल त्यांच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *