सध्याचा काळ हा रॅप सॉंग, पॉप सॉंग, डिजे यांसारख्या गाण्यांचा आहे. सध्याच्या युवा पिढीला ही गाणी आवडत असली तरी काही लोक अजुनही ९० आणि २००० च्या दशकातील गाण्याच्या प्रेमात आहेत. तो असा काळ आहे जेव्हा जग बदलत होते आणि संगीत क्षेत्रात सुद्धा अमुलाग्रह बदल घडुन येत होते. त्याकाळात चित्रपटातील गाण्यांसोबतच अल्बममधील गाणी देखील सुपरहिट व्हायची. आताच्या काळात प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असल्यामुळे इंटरनेटच्या अधीन सगळेच झालेले दिसतात. त्यामुळे कोणीही कोणतीही कुठल्याही काळातली गाणी सहज ऐकु शकतात. पण ९० च्या दशकातील मुलांना ही गोष्ट करणे शक्य नव्हते.

कारण त्यावेळी काही गाणी घरातल्यांसोबत बघण्यासारखी नव्हती. किंबहुना त्याकाळी मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये तशा गाण्यांवरुन तेवढा मोकळेपणा नव्हता. शिवाय तो काळ सोशल मीडियाचा सुद्धा नव्हता जे कोणी शांतपणे स्वतापुर्ती ती गाणी ऐकु शकेल. आज आम्ही तुम्हाला अशा काही गाण्यांबद्दल सांगणार आहोत जी गाणी त्याकाळी मुले गुपचुप ऐकायचे.

जादु हे न*शा हे – जिम्स या चित्रपटातील या गाण्यामध्ये अभिनेत्री बिपाशा आणि जॉन मध्ये खुप चांगली केमिस्ट्रि पहायला मिळाली. हे गाणे शान आणि श्रेया घोषाल यांनी गायले होते. त्यावेळी जरी हे गाणे खुप गाजले असले तरी त्या गाण्यातील काही सिन्स तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत नाही पाहु शकत. त्यामुळे त्याकाळच्या लहान मुलांनी हे गाणे गपचुप पाहिले होते.

भीगे होंठ तेरे – अभिनेता इंम्रान हाश्मी म्हटलं कि त्याच्या गाण्यांपासुन त्याकाळी पालक मुलांना लांबच ठेवायचे. त्यामुळे मुले सुद्धा इम्रानची गाणी लपुन पहायचे. त्याकाळी म*र्ड*र चित्रपटातील मल्लिका शेरावत आणि इमरान हाश्मीचे हे गाणे जबरदस्त हिट झाले होते. मात्र त्यातील काही सीन्समुळे पालक मुलांना ते गाणे पाहु द्यायचे नाही.

कलियों का चमन – मेघना नायडुचा जबरदस्त डान्स असलेले हे गाणे त्याकाळी खुप गाजले होते. या गाण्यावर केवळ मुलीच नव्हे तर मुलेसुद्धा ठेका धरायची. पण या गाण्याच्या चित्रिकरणामुळे पालक त्यांच्या मुलांना लांब ठेवायचे.

जरा जरा बहकता हे – आर माधवन आणि दिया मिर्झाच्या रोमॅण्टीक केमिस्ट्रिने सजलेले हे गाणे आज ही ऐकल्यावर धुंद व्हायला होतं. त्यातील बोल मनाला भावणारे आहेत पण त्याकाळी पालकांना मुलांना हे गाणे दाखवयला थोडं कसेतरी वाटयचे.

दिलबर शिकदुम – नवरा बायको मधील नटखट रोमान्स दाखवणारे हे गाणे त्याकाळी टिव्हीवर लपुन छपुन पाहिले जायचे. अभिषेक बच्चन आणि रिमी सेनवर चित्रित झालेले हे गाणे त्यावेळी खुप लोकप्रिय ठरले होते पण मुलांना आईवडिलांसमोर हे गाणे पहायला लाज वाटयची. त्यामुळे घरात आईवडिल असताना हे गाणे लागले कि मुले लगेच चॅनच चेंज करायचे.

कांटा लगा – ९० च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध अल्बम कांटा लगाला कोणीच विसरु शकत नाही. ९० च्या दशकातील मुले या गाण्यावर अगदी मनमुराद नाचली होती. पण पालकांसमोर मात्र हे गाणे पाहणे सोडा तर ऐकणे सुद्धा थोडे मुश्किल वाटयचे. पण पालक घराबाहेर पडल्यावर मुले या गाण्याचा खुप आनंद घ्यायचे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *