अनोखी कोणतीही गोष्ट घडली कि सोशल मीडियावर व्हायरल व्हायला फारसा वेळ लागत नाही. हल्ली प्रत्येक दिवसाला अनोखी गोष्ट व्हायरल होत असते. सध्या सोशल मीडियावर ‘जाने मेरी जानेमन बचपन का प्यार मुझे भुल नही जाना रे’ असे गाणे गाण्याऱ्या एका लहान मुलाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या मुलाचे नाव सहदेव असे आहे. सध्या प्रत्येक स्टार या गाण्यावर व्हिडीओ तयार करत आहे. पण या गाण्याचे हे बोल आले तरी कुठुन हे तुम्हाला माहित आहे का… नाही तर आज आम्ही तुम्हाला या गाण्यापाठचा इतिहास सांगणार आहोत…
तर मंडळी ‘जाने मेरी जाने मन’ हे गाणे गुजरातच्या आदिवासी लोकगायक कमलेश भरोत ने २०१८ मध्ये तयार केले होते. कमलेश या गाण्याचा गायक आहे पण हे गाणे शब्दबद्ध केले पी पी बढीया यांनी तर संगीत बद्ध केले मयुर नदीयां यांनी. सोशल मीडियावर हे गाणे व्हायरल झाल्यावर कमलेश यांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यात त्यांनी सांगितले कि, २०१८ मध्ये हे गाणे तयार झाले होते त्यानंतर अहमदाबादच्या एका चित्रपट कंपनीने या गाण्याचे राईट्स विकत घेतले. आणि मग २०१९ मध्ये युट्युब चॅनलवर हे गाणे रिलिज केले गेले.
आता पर्यंत हे गाणे ४४ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे. कमलेश यांनी त्यांच्या करियर मध्ये आतापर्यंत ६ हजार हुन अधिक गाणी गायली आहेत. त्यातील काही गाण्याचे राईटर आणि कंपोजर ते स्वता आहेत. त्यांनी गायलेल्या गाण्याला देशभरातुन इतका उत्तम प्रतिसाद मिळत आहे हे पाहुन खुप बरे वाटते अशा भावना कमलेश यांनी एका मुलाखतीत व्यक्त केल्या. पण हे गाणे व्हायरल करण्याचे क्रेडीट मात्र त्यानी सहदेवला दिले आहे.
त्यांना एकदातरी सहदेवला भेटण्याची इच्छा आहे. हे गाणे व्हायरल झाल्यापासुन अनेक सिंगर आणि रॅपर्सनी त्यातील बोल वापरुन अनेक वेगवेगळे व्हिडीओ तयार केले. हे गाणे लोक इतक्या मोठ्या प्रमाणात वापरत आहे याचा तुला काही त्रास होतो का .. गाणे वापरल्याबद्दल तु कॉपी राईटस ची केस करणार का असे कमलेशला विचारले असता त्यानं सांगितले कि या गाण्याचे कॉपी राईटस् एका चित्रपट कंपनीकडे आहेत त्यांमुळे या गाण्या बाबतीतले निर्णय ती कंपनीच घेईल.
आता हे गाणे व्हायरल करण्यात मोलाचा वाटा असणाऱा सहदेव याच्याबद्दल जाणुन घेऊ. २०१९ मध्ये सहदेवला त्याच्या शिक्षकांनी त्याच्या आवडीचे गाणे गाण्यास सांगितले त्यावेळी त्याने हे गाणे गायले होते. आणि त्याच्या शिक्षकांनी सुद्धा या गाण्याची व्हिडीओ रेकॉर्डींग केली आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. या गाण्यावर रॅपर बादशहाने एक व्हिडीओ बनवला त्यानंतर हे गाणे जोरदार व्हायरल झाले. सध्या सोशल मीडियावर या गाण्यावरचे रिल्स खुप व्हायरल होत आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !