लग्नानंतर ‘सोनाक्षी सिन्हा’ बनेल सलमान खानच्या घराची सदस्य, या व्यक्तीला करत आहे डेट !

133

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही बॉलिवुडमधली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे . सोनाक्षी ही अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची लेक आहे हे सर्वानाच ठाऊक आहे. सोनाक्षीने सलमान खान सोबत दबंग या चित्रपटातुन चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
बॉलिवुडमधील अनेक कलाकारांना सलमान खानने योग्य मार्गदर्शन दिले आहे. त्याच्यामुळे अनेक नवख्या कलाकारांना बॉलिवुडचा रस्ता मोकळा झाला. असे म्हणतात कि सलमान खानचा वरदहस्त डोक्यावर असेल तर चित्रपटसृष्टीत हमखास यश मिळते. याच यादीत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे सुद्धा नाव आहे.

सोनाक्षीच्या पदार्पणासाठी सलमानने त्याचा खास मित्र गोविंदासोबत सुद्धा पंगा घेतला होता. सलमानने आपली मुलगी नर्मदाचा डेब्यु करावा अशी गोविंदाची इच्छा होती. पण सलमानने शत्रुघ्नला सोनाक्षीच्या बाबतीत वचन दिले होते. ते पाळण्यासाठी सलमानने दबंगसाठी सोनाक्षीची निवड केली. त्यावेळी सलमानचे गोविंदासोबत थोडे वाद झाले आणि त्यांनी एकमेकांशी बोलणे बंद केले.

सोनाक्षीबद्दल बोलायचे झाल्यास तिने दबंग व्यतिरिक्तसुद्धा आणखी काही हीट चित्रपट दिले होते. सोनाक्षीबद्दलची खास गोष्ट म्हणजे ती कदाचित सलमानची नातलग बनण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे सोनाक्षी सध्या बंटी सचदेवाला डेट करत आहे.

बंटी सचदेवा हा सलमानचा भाऊ सोहेल खानचा मेहुणा आहे. त्यामुळे सोनाक्षीने जर बंटी सोबत लग्न केले तर तरी सलमानच्या परिवारातील हिस्सा बनु शकते. शिवाय या दोघांचे नाते त्यांच्या परिवाराला सुद्धा मान्य असल्याचे म्हटले जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !