या कारणामुळे वयाच्या ६०व्या वर्षी आजोबा दुसऱ्यांदा चढले बोहल्यावर, जाणून घ्या !

91

लग्न म्हणजे सामाजिक आणि धार्मिक मान्यता प्राप्त झालेलं स्त्री आणि पुरुष यांच्यामधील बंधन. आपण आतापर्यन्त विविध विवाह सोहळे पाहिले आहेत, ऐकले आहेत. परंतु सध्या चर्चेचा विषय ठरलेला लग्नसोहळा हा फारच वेगळा आहे. अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथील ६०वर्षीय विदुर आजोबा तबा चिमाजी कुदनर यांनी ४० वर्षीय सुमन नावाच्या मुलीशी दुसरा विवाह केला आहे. अगदी साधेपणाने हा आगळा वेगळा लग्नसोहळा मोजक्याच वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत पार पडला.

कुदनर यांच्या पहिल्या पत्नीचे १ वर्षांपूर्वी लग्न झाले आणि त्याच काळात त्यांच्या मुलीचे देखील लग्न झाले. त्यामुळे त्यांचा सांभाळ करण्यासाठी कोणीच नसल्याने कुदनर आजोबांवर एकटेपणाची वेळ आली. त्यांचे सर्वच खाण्यापिण्याचे आणि दैनंदिन गोष्टींचे हाल होत असल्याने त्यांच्या मुलीने व त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मुलीनेच नात्यातच एक ४० वर्षीय मुलगी सुमन हिच्याशी लग्न लावून दिले.

हे लग्न मला माझा एकटेपणा आणि हाल होत असल्याने कार्याला लागले असल्याचे भावनिक उदगार कुदनर आजोबा यांनी काढले आहेत. अनेकांना अनुरूप स्थळ मिळत नाही आणि इथे चक्क ६० वर्षीय आजोबांनी लग्न केल्याने सर्वत्र त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

एकटेपणा आणि येणाऱ्या अडचणींमुळे मी हे विधीवत लग्न केलं. वर्षभरापूर्वी आमची मंडळी वारली आणि मुळीच लग्न केलं, मग खाण्यापिण्याच्या सोयीसाठी मग हि दुसरी मंडळी केली. साधारण ४०-५० या मंडळीच वय आहे, आता आम्ही आमचं चालवू, खाण्यापिण्याचे हाल होत होते म्हणून मग मुलगी, मित्रपरिवाराने दुसरं लग्न करण्याचं बोलले मग काय, आम्ही पण तयार झालो, आता तिलाच जीव लावीन आणि सुखदुःख ती जाणून आपलं घेईल, असे कूदनर आजोबांनी सांगितले.

शिंदोडी गावचे शिंदोडी विविध कार्यकारी सेवा समितीचे चेअरमन यांनी या लग्नाबद्दल माहिती देताना सांगितले, आमच्या गावामध्ये काळ एक विवाह संपन्न झाला, त्यांची जेवणाची, खाण्यापिण्याची त्यांची मंडळी एक वर्ष आधी निधन झालं आणि त्यांच्या बाकीच्या प्रपंचाचा हातभार गेला आणि शेती साठी त्यांना आधार राहिला नाही, गैरसोय झाली, त्यांच्या मुलीचा पण विवाह झाला आहे म्हणून  सर्व ग्रामस्थांनी पंचांनी सर्वांनी तो विषय घेतला आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना आमच्या नात्यातली एक मुलगी बघितली आणि तो विवाह मोठ्या थाटामाटामध्ये आणि भारतीय संस्कृतीच्या विधीवत पार पाडला. यांच्यामध्ये गैर मानण्याचं काही कारण नाही त्यांना लग्न करण्याची गरजच होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !