मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही बॉलिवुडमधील सदा चर्चित जोड्यांपैकी एक आहे. अरबाज खान सोबत घ*ट*स्फो*ट झाल्यावर मलायकाने अरबाजसोबतच्या नात्याचा जगासमोर स्विकार केला. मलायकाने अनेकदा तिचे व अर्जुनचे फोटो पोस्ट केले होते.या फोटोंवर काही लोकांनी टिका केली तर काहींनी प्रेम दर्शवले. मात्र लोकांनी केलेल्या टिकेचा त्यांच्यावर कोणताच फरक पडला नाही.

दरम्यान काही मीडिया रिपोर्टस् मध्ये म्हटले आहे कि मलाइका अर्जुनपेक्षा जास्त पैसे कमावते. रिपोर्टस् नुसार मलाइकाने चित्रपटांमध्ये आयटम नंबर करुन तसेच रियालिटी शो जज् करुन १०० कोटी रुपयांची प्रोपर्टी कमावली आहे. तर मलाइकाच्या तुलनेत अर्जुनची एकुण कमाई ८८ करोड रुपये आहे. या गोष्टीवर अर्जुंनने त्याची नाराजी व्यक्त केली आहे.
मलाइका गेली २० वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. तिने आता पर्यंत काही चित्रपट, ब्रॅंण्डस् इंडोर्समेंटस् आणि टीव्ही शो मध्ये काम केले आहे.

खरेतर या सर्व गोष्टीची अर्जुन कपुरसोबत करणे चुकीचे आहे. या सर्व गोष्टीवर अर्जुनचा पारा चढला आणि त्याने इन्स्टाग्रामवर या प्रकरणी स्टोरी टाकत राग व्यक्त केला. त्याने लिहिले कि, २०२१ मध्ये अशी हेडलाइन वाचणे खुप दुखद आणि लाजिरवाणे आहे. हे खरे आहे कि ती चांगले कमावते आणि इथपर्यंत पोहचण्यासाठी तिने खुप मेहनतसुद्धा घेतली. त्याची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. किंबहुना माझ्याशीसुद्धा नाही.

ही पोस्ट केल्याच्या काही वेळातच अर्जुनने ही पोस्ट डिलीट केली होती पण तो पर्यंत ती चांगलीच व्हायरल झाली. मलाइकाबद्दल बोलयचे झाल्यास ती कित्येक वर्षे इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. तिने आतापर्यंत अभिनेत्री, दिग्दर्शक, आणि आता टेलिव्हिजन होस्ट, जज् म्हणुन काम केले आहे.

काही दिवसांपुर्वी एका इंटरव्ह्युमध्ये अर्जुनने म्हटले होते कि मलाइका खुप स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर आहे याचा मला खुप आनंद आहे. तिने वयाच्या २० वर्षांपासुन काम सुरु केले आणि अजुनही करत आहे. ती स्वताची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मी तिला कधीच कोणत्याही गोष्टीची तक्रार करताना किंवा नकारात्मका पोहचवताना पाहिलेले नाही. ती नेहमीच तिच्या कामासंदर्भात बोलते आणि तेच करते ज्याने तिला सुख मिळते. मी तिच्याकडुन नेहमीच काहीना काही शिकत असतो.

मलाइका आणि अर्जुनचे चाहते त्यांच्या लग्नाची मनापासुन वाट पाहत आहेत. मात्र लग्नाच्या बाबतीत दोघेही गप्पच बसतात. काही दिवससांपुर्वी ते दोघे २०२० मध्ये लग्न करणार होते मात्र कोरोनामुळे ते होऊ शकले नाही अशी अफवा सुद्धा पसरली होती. त्यामुळे आता २०२१ मध्ये तरी ते लग्न करतात कि नाही याची चाहाते वाट पाहत आहे. ते दोघेही त्यांच्या नात्यावरुन चर्चेत असतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *