सध्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी प्रमाणेच तिची बहिण शमिता शेट्टी सध्या खुप चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी शमिता तिचे भाऊजी राज कुंद्रा यांना समर्थन दिल्यामुळे चर्चेत होती. पण आता मात्र तिने सर्वांना चकित करुन टाकले आहे. घरात तसेच बहिणीच्या आयुष्यात एवढे मोठे वादळ आले असताना शमिताने बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सध्या सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात असुन या शोच्या निर्मात्यांना देखील लोक खडेबोल सुनावत आहेत. शमिताने यापुर्वीही बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणुन काम केले होते. तरीही लोक तिच्याबद्दल आणखी जाणुन घेण्यात उत्सुक आहे.

जेव्हापासुन राज कुंद्रा यांचे अ*श्ली*ल फिल्म आणि अॅपच्या बाबतीतले पितळ उघडे पडले तेव्हापासुन प्रत्येकाच्या मनात शमिता शेट्टी बाबतही प्रश्न तयार होऊ लागले आहेत. चित्रपटांपासुन कित्येक वर्षे दूर राहुन देखील शमिता कडे असा कोणता कमाईचा सोर्स आहे असे लोकांचे म्हणणे आहे. शिल्पा शेट्टी ही एका अभिनेत्री होण्यासोबतच एक बिझनेस वुमन सुद्धा आहे. तिचा करोडोचा कारभार आहे. मात्र आज या लेखातुन आम्ही तुम्हाला शिल्पा शेट्टी नाही तर तिच्या बहिणीच्या म्हणजेच शमिताच्या कमाईबद्दल सांगणार आहोत.

गेली कित्येक वर्षे शमिता मोठ्या पडद्यापासुन दूर आहे. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ब्लॅक विडो या वेब सिरीजमध्ये तिला सर्वात शेवटी पाहिले गेले होते. पण त्याआधी तिने कित्येक वर्षे अभिनय क्षेत्रात काम केलेच नव्हते. त्यामुळे शमिता कमावते तरी कशी असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात येणे साहजिकच आहे. तर मंडळी शमिता एक अभिनेत्री सोबतच इंटेरियर डिझाइनरसुद्धा आहे. त्यासोबतच ती काही ब्रॅंड एंडोर्समेंट सोबत सलग्न आहे.

त्यामुळे शमिता भलेही मोठ्या पडद्यापासुन दुर असली तरी ती तिच्या कामातुन लाखो करडो रुपये कमावते. शिल्पा शेट्टी प्रमाणेच तिचेही वार्षिक उत्पन्न १ ते ५ मिलियन डॉलर असल्याचे म्हटले जाते. मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉसच्या घरात पुन्हा येण्यासाठी शमिताने भलीमोठी फि घेतली आहे.

राज कुंद्राचे प्रकरण समोर आल्यानंतर शिल्पा शेट्टी सोबतच तिच्या बहिणीला सुद्धा या प्रकरणात ओढले जात आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये जेव्हा तिला राज कुंद्रा यांच्यावरुन प्रश्न करण्यात आले त्यावेळी या वादाच्या आधीच तिने बिग बॉससाठीचे कॉण्ट्रॅक्ट साईन केल्याचे सांगितले मात्र मिळालेल्या माहितीनुसार शोच्या आदल्याच दिवशी ऑफर मिळाल्याचे बोलले जाते.
बिग बॉसच्या घरात शमिताला पाहिल्यावर लोक नाराजी व्यक्त करत आहेत.

सध्या ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. राज कुंद्रा यांना समर्थन दिल्या प्रकरणी तिला खुप ट्रोल केले जात आहे. तर एका युजरने, सेम स्पर्धकाला शो मध्ये का आणता अशी सुद्धा विचारणा केली आहे. तर दुसऱ्या एका युजरने शमिता शेट्टीला का आणले दुसरे कोणी भेटले नाही का अशी कमेंट केली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *