अमीर खानचा भाऊ फैजल खान खुप वर्षांच्या कालावधीनंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार आहेत. फॅक्टरी या चित्रपटातुन फैजन अभिनयासोबतच दिग्दर्शनातही स्वताचे नशिब आजमवण्यास सज्ज आहे. काही दिवसांपुर्वीच झालेल्या एका इंटरव्ह्युमध्ये फैजलने त्यांच्या व अमिरच्या ट्युनिंग सोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही सांगितले. शिवाय त्यांनी पुन्हा दुसरे लग्न का केले नाही याबाबतची माहितीसुद्धा दिली.

पत्नीचा खर्च करु शकेन इतका माझ्याजवळ पैसा नाही – पुन्हा लग्न न केल्याच्या प्रश्नावर फैजलने सांगितले कि माझ्याकडे आता इतके पैसे नाही कि मी माझ्या पत्नीचा खर्च करु शकेन किंवा एखादी गर्लफ्रेंड ठेवु शकेन. सध्याच्या या महागाईच्या काळात एखादी गर्लफ्रेंड असणे देखील महागात पडु शकते. गर्लफ्रेंडचा खर्च आणि नखरे हे पत्नीपेक्षा जास्त असतात.

फिल्म हिट झाली कि गर्लफ्रेंड बनवीन – एवढेच नव्हे तर फैजल खानने सांगितले कि जर माझा फॅक्टरी हा चित्रपट हिट झाला तर मी गर्लफ्रेंड बद्दल किंवा लग्नाबद्दल विचार करिन. पण सध्या माझा तसा काहीच विचार नाही. फैजल खान अमीर खान सोबत मेला या चित्रपटात दिसला होता.

माझ्यात आणि अमीरमध्ये सर्व काही ठिक आहे – अमीर खानच्या ट्युनिंगबाबत फैजलने सांगितले कि आमच्या दोघांमध्ये सर्व काही ठिक आहे. मी स्वताचे निर्णय स्वता घेतो. मी काय बनवले आहे मलाच ठावुक नाही अशा प्रकारचा मी दिग्दर्शक नाही. मी माझ्या कामात सर्व पणाने दिले आहे. त्यामुळे प्रेक्षकांसोबत देवाचा काय निर्णय असेल हे येत्या काळात समजेल.

माझे स्वताचे लग्न टिकले नाही तर दुसऱ्याच्या लग्नाबद्दल काय सांगु – फैजल खानला जेव्हा अमीर खान आणि त्याच्या पत्नीच्या झालेल्या घ*ट*स्फो*टा*बद्दल विचारले तेव्हा तो म्हणला कि मी कोणालाच काही बोलु शकत नाही. कारण जिथं माझं स्वताचं लग्न जास्त टिकु शकलं नाही तर मी इतर कोणाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलु शकत नाही. त्यांना माहित आहे कि त्याच्या आयुष्यात काय बरोबर आहे. माझ्या आईने आणि अमीर दोघांनी ही माझ्या फॅक्टरी या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

यश मिळाले नाही म्हणुन फैजल घरातुन पळुन गेले होते – फैजल खानने १९९४ मध्ये मदहोष या चित्रपटातुन पदार्पण केले होते. त्यानंतर अमिरसोबत मेला या चित्रपटात दिसला होता. पण तरीही ते स्वताची ओळख बनवु शकले नाहीत. काही बी ग्रेड चित्रपटात काम केल्यावर फैजल चित्रपटातुन गायब झाला. त्यानंतर फैजलने त्याचा भाऊ अमिरवर काही गंभीर आरोप केले होते.

अमीर खानवर लावले होते गंभीर आरोप – काही चित्रपट करुन सुद्धा जेव्हा फैजलला इंडस्ट्रीमध्ये यश मिळाले नाही तेव्हा तो स्वताचे मानसिक संतुलन गमवुन बसला. त्यानंतर तो कोणाला ही न सांगता घरातुन निघुन गेला. काही दिवसांनंतर तो परत सुद्धा आला. पण परत आल्यावर त्याने अमीरवर काही गंभीर आरोप सुद्धा लावले.

मानसिक आजाराशी लढत होता फैजल – अमीरने फैजला घरात कैद करुन ठेवले होते असे फैजलने सांगितले. शिवाय त्याला मानसिक रुग्ण आहे असं सांगुन औषध घेण्यास भाग पाडले. फैजलने अमीरवर केलेल्या या आरोपांमुळे इंडस्ट्रीमध्ये गदारोहळ माजला होता. तेव्हा फैजल मानसिक आजाराशी झगडत होता.

बालकलाकार म्हणुन करियरला केली होती सुरुवात – १९६९ मध्ये आलेल्या प्यार का मौसम या चित्रपटातुन फैजल खानने बालकलाकार म्हणुन करियरला सुरुवात केली होती. त्या चित्रपटात त्यांने शशी कपुरच्या बालपणीची भुमिका साकारली होती. त्यानंतर त्याने कयामत से कयामत तक या चित्रपटात छोटी भुमिका केली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *