सलमान खान म्हटलं की चर्चा ही होणारचं. त्याने काहीही केलं कि तो लगेच लाईमलाईटमध्ये येतो. त्यामुळेच त्याला बॉलिवुडच्या टॉपच्या अभिनेत्यांपैकी एक मानले जाते. सलमानचे चित्रपट त्याच्या चाहत्यांना नेहमीच आवडतात. विशेष म्हणजे सलमानचे काही फ्लॉप चित्रपटसुद्धा १०० करोडचा बिझनेस करतात. यावरुन तुम्ही सलमानची लोकप्रियता ओळखु शकता. सलमानला इंडस्ट्रीमध्ये भाईजान या नावाने ओळखले जाते. सलमानला इंडस्ट्रीमध्ये खुप मान आहे. पण तुम्हाला माहित आहे का की सलमानला त्याच्या एका नोकराने खुप मारले होते.

याबाबत स्वता सलमानने कॉमेडी नाईटस् विथ कपिल या शोमध्ये सांगितले होते. शो मध्ये त्याने सांगितले कि त्याच्या नोकराने त्याला एकदा मारले होते. सलमानने सांगितले कि मी आणि अरबाज खुप लहान होतो. तेव्हा बाबा कोणत्यातरी कामानिमित्त बाहेर गेले होते. तेव्हा आमच्या घराला नुकताच रंग मारला होता. भिंती खुप स्वच्छ होत्या. तेव्हा मी आणि अरबाज भिंतींवर लाथ मारत होतो. तेव्हा लहानपणी आमचे असेच खेळ असायचे.

कोणाची किक सर्वात जास्त उंच जाते हे आम्हाला पाहायचे होते. तेव्हा आम्हाला मस्ती करताना आमच्या नोकराने पाहिले. तो खुप वर्षांपासुन आमच्या घरी काम करत होता. शिवाय तो खुप वयस्करही होता. त्यामुळे आमची मस्ती बघुन त्याने आमच्या का*ना*खा*ली मारली. त्याने मारल्यावर आम्ही रडु लागलो. आणि त्याची तक्रार करण्यासाठी बाबांकडे गेलो. त्यानंतर बाबांनी त्याला फोन करुन त्याने असं का केलं विचारलं. तेव्हा आम्ही नवीन रंगवलेली भिंत खराब केल्याचे बाबांना सांगितले. त्याचं ऐकल्यानंतर बाबांनी पुन्हा आमच्या का*न*शी*ला*त लगावली.

हा प्रसंग सांगत असताना स्वता सलीम खानसुद्धा कपिल शर्माच्या शो मध्ये उपस्थित होते. तेव्हा त्यांनी सांगितली कि त्यांच्या घरातील नोकर खुप वयस्कर आहेत. त्यांची पत्नीसुद्धा त्यांचा खुप सन्मान करते. सलमानच्या पुढील कामाबद्दल सांगायचे झाल्यास तो लवकरच टायगर ३ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कॅटरिना कॅफ लीडमध्ये दिसणार आहे. तर इम्रान हाश्मी विलनच्या भुमिकेत दिसणार आहे. या व्यतिरिक्त ‘एंटीम: द फाइनल ट्रुथ’, ‘कभी ईद कभी दीवाली’, ‘किक 2’ हे चित्रपट सुद्धा सलमानचे येऊ घातले आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *