साऊथमधील एक मोठा सुप्रसिद्ध अभिनेता, ज्याने आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांनाच भुरळ घातली; असा अभिनेता म्हणजे नागार्जुन अक्किनेनी. नागार्जुन एक अभिनेता, चित्रपट निर्माता, दूरदर्शन प्रस्तुतकर्ता आणि उद्योजक आहे. नागार्जुनने १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. तेलुगू, तामिळ आणि काही हिंदी भाषिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. नागार्जुन यांनी बालकलाकार म्हणून तेलुगू चित्रपटांमध्ये १९६७ मध्ये काम करण्यास सुरुवात केली.

हिंदी चित्रपट सृष्टीत १९९२ साली त्यांनी “खुदा गवाह” या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात प्रसिद्ध कलाकार श्रीदेवी आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याआधीपासून ते साऊथ चित्रपट सृष्टीत सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध होते. नागार्जू यांची चित्रपट कारकीर्द फार मोठी आहे. विक्रम, सीवा, मंजू, जख्म, क्रिमिनल, मास, मनम, शिर्डी साई हे काही नागार्जुन यांचे प्रसिद्ध चित्रपट आहेत. नागार्जुन हे त्यांच्या अभिनय आणि चित्रपटांव्यतिरिक्त त्यांच्या लग्जरी लाईफस्टाईलमुळे देखील चर्चेचा विषय ठरतात. चला तर जाणून घेऊया नागार्जुन यांची एकूण संपत्ती आणि वार्षिक उत्पन्न किती आहे !

सीए नॉलेज वेबसाइटनुसार, नागार्जुन यांची एकूण मालमत्ता सुमारे ८०० करोड रुपये आहे. एवढेच नाही तर त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे ४८ कोटी आहे. नागार्जुन यांचा अन्नपूर्णा स्टुडिओ आहे, जो ७ एकरमध्ये पसरलेला आहे. चित्रपट निर्मितीबरोबरच तो चित्रपटांच्या वितरण व्यवसायातही सामील आहे. नागार्जुन वितरण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर आहेत. यासह, नागार्जुन अन्नपूर्णा इंटरनॅशनल स्कूल ऑफ फिल्म अँड मीडिया, हैदराबादचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या आलिशान बंगल्याची किंमत ४२ कोटींपेक्षा जास्त आहे.

नागार्जुन यांची सर्वाधिक कमाई चित्रपट आणि जाहिरातींमधून होते. चित्रपटांमध्ये अभिनय करण्यासाठी नागार्जुन मानधन स्वीकारतातच परंतु रिलीजनंतर चित्रपटाला झालेल्या फायद्याचा काही भाग देखील घेतात. ते जाहिरातींमध्ये काम करण्यासाठी खूप मानधन आकारतात. जाहिराती आणि चित्रपटांमधून त्यांना ४८ करोड इतके वार्षिक मानधन तर ४ करोड रुपये दरमहा ते कमाई करतात. मा टीव्ही या टीव्ही वरील तेलुगू चॅनेलमध्ये नागार्जुनचाही मोठा वाटा आहे. त्यात तो मोठा वाटाधारक आहे.

यासह, अन्नपूर्णा स्टुडिओ, एन-कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई हे मास्टर्स ऑफ इंडियन बॅडमिंटन लीगचे सह-मालक आणि टीव्ही निर्माता आहेत. त्यांच्या कमाईमुळे, नागार्जुन यांचे नाव फोर्ब्सच्या यादीत दोनदा (२०१२ आणि २०१३) आले आहे.
नागार्जुन यांच्याकडे शानदार कारचे कलेक्शन आहे, यामध्ये रेंज रोव्हर, ऑडी ए७, बीएमडब्ल्यू ७, मर्सिडीज एस क्लास अशा जबरदस्त कारचे कलेक्शन आहे. या कारची किंमत ६५ लाखांपासून ते ३ करोडपर्यंत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *