अमिताभ बच्चन यांनी केवळ भारतातच नव्हे तर भारता बाहेरही भरपुर नाव कमावले. या महानायकाने जेवढे नाव कमावले तेवढेच पैसे सुद्धा कमावले. बच्चन परिवाराला देशातील अरब पती कुटुंबीयांमध्ये गणले जाते ते केवळ आणि केवळ अमिताभ बच्चन यांच्या मेहनतीमुळेच. सध्या अमिताभ यांचे वय ७८ आहे तरी ते तितक्याच जिद्दीने काम करत आहेत. करोडो रुपयांचे मालक असलेल्या बच्चन कुटुंबियांच्या घरात सर्व प्रकारच्या सोयीसुविधा आहेत. पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्या कुटुंबातील अशा एका व्यक्ती बद्दल सांगणार आहोत जो पैशांसाठी वणवण करत आहे.

४०० मिलीयन संपत्तीचे मालक आहेत अमिताभ बच्चन – बॉलिवुडच्या महानायकांची संपत्ती ४०० मिलीयन आहे. अमिताभ यांनी त्यांच्या करियरमध्ये १८० हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केले. १९६९ मध्ये सात हिंदूस्थानी या चित्रपटातुन त्यांनी त्यांच्या करियरला सुरुवात केली होती. त्यांनंतर त्यांनी मागे वळुन पाहिले नाही. त्यांच्या कुटुंबाची भरभराट झाली मात्र त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य मात्र एकवेळच्या तुकड्यासाठी सुद्धा कष्ट करत आहेत. आता तुम्ही म्हणाल कि एवढ्या करोडपती कुटुंबात अस कोण आहे जो या वैभवापासुन वंचित आहे. बच्चन कुटुंबातील ऐश्वर्या, अभिषेक , जया बच्चन यांच्याकडे बक्कळ पैसा आहे हे आपल्याला ठावुक आहे.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते अमिताभ यांच्या मेहुण्याचा मुलगा अनुप रामचंद्रबद्दल. बच्चन कुंटुंबाचे अनुप रामचंद्रसोबत एक खास नाते आहे. सध्या रामचंद्र हालाखीचे जीवन जगत आहे. अनुप रामचंद्रचा परिवार पुर्वी थोडा श्रीमंत होता. पण कालांतराने त्यांना गरीबीला सामोरे जावे लागले. अमिताभ आणि अनुप यांच्यात जमिनीच्या वादामुळे दुरावा आला.

या कारणांमुळे अमिताभसोबत दुरावा तयार झाला – पैशांच्या चणचणीमुळे अनुप अभिषेक बच्चनच्या लग्नाला जावु शकले नव्हते असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. अनूप आणि त्याची पत्नी मृदुला काटघर येथील अमिताभ बच्चन यांच्या घरी राहतात. अनूप यांच्या मते, हे घर वडिलोपार्जित आहे. या घर आणि जमिनीवरुनच अमिताभ आणि अनूप यांच्यात काही वाद आहेत. परंतु तरीही अमिताभ यांनी अनूपच्या कुटुंबापासून दूरावा का ठेवला याचे कारण अध्याप स्पष्ट झालेले नाही. हरिवंश राय बच्चन यांच्या बालपणीच्या आठवणी या घरात संग्रहित करुन ठेवाव्यात अशी काहींची मागणी आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *