बॉलिवुडचा सलमान खान इंडस्ट्रीमध्ये भाईजान म्हणुन संबोधले जाते. गेली ४ दशके तो बॉलिवुडवर सत्ता गाजवत आहे. या दशकांमध्ये त्याने बॉलिवुडला अनेक सुपरहिट सिनेमे दिले. त्यातील त्याचा अभिनय पाहुन प्रेक्षकांच्या मनात त्याने अढळ स्थान निर्माण केले. सलमानने केवळ चित्रपटापुरते मर्यादित न राहता जाहिराती, रियालिटी शो मार्फत सुद्धा बक्कळ पैसा कमावला आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते आसुसलेले असतात. अशावेळी खुप गदारोळ मा*ज*तो. त्यामुळे त्यावेळी त्याचे संरक्षण करण्यास तेथे उपस्थित असतो तो त्याचा बॉडीगार्ड शेरा.

शेरा हा सलमानचा पर्सनल बॉडीगार्ड आहे. सलमानने त्याचा सुपरहिट चित्रपट बॉडीगार्ड हा शेराला समर्पित केला होता. त्या चित्रपटाच्या शेवटी शेरा सलमानसोबत दिसला होता. शेरा हा नेहमीच सावलीप्रमाणे सलमानच्या आजुबाजुला वावरत असतो व येणाऱ्या अडीअडचणीतुन त्याला बाहेर काढत असतो. चला तर जाणुन घेऊ सलमान शेराला त्याच्या ड्युटीसाठी किती रुपये पगार देतो.

शेरा हा बॉलिवुडमधील सर्वात प्रसिद्ध बॉडीगार्ड आहे. तो गेली २६ वर्षे सलमानकडे नोकरी करत आहे. शेराचे खरे नाव गरमीत सिंह जॉली असे आहे. त्याचा जन्म मुंबईत राहणाऱ्या शीख परिवारात झाला होता. शेराला सुरुवातीपासुनच बॉडीबिल्डींगची आवड होती. १९८७ मध्ये त्याने मुंबई ज्युनियरचा किताब जिंकला होता. १९९५ मध्ये सलमानला बॉडीगार्डची आवश्यकता होती तेव्हा अरबाजने सलमानची ओळख शेराशी करुन दिली तेव्हा पासुन शेरा सलमानच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत आहेत.

शेराची स्वताची एक सिक्युरिटी एजेंन्सी आहे. या एजन्सीचे नाव त्याने त्याच्या मुलाच्या नावावरुन टायगर असे ठेवले आहे. शेराने अनेक इंटरनॅशनल कलाकारांना सिक्योरीटी दिली आहे. जस्टीन बीबीरपण जेव्हा भारतात आलेला तेव्हा त्याच्या सुरक्षेची जबाबदारीसुद्धा शेराकडेच होती. याव्यतिरिक्त त्याने विल स्मिथ, जॅकी चैन, मायकल जॅक्सन यासांरख्या मोठ्या व्यक्तींनासुद्धा सुरक्षा दिली आहे. पण वैयक्तीकरित्या शेरा सलमानसोबत नेहमीच पाहण्यास मिळतो.

एका रिपोर्टनुसार सलमान खान शेराला वर्षाला २ करोड रुपयांपेक्षा जास्त पगार देतो. म्हणजेच दर महिना १६ लाख रुपये पर्यंत पगार दिला जातो. एका इंटरव्ह्युमध्ये शेराने सांगितले होते कि मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सलमान खानच्या सोबत राहिन.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *