प्रकाश राज हे केवळ साऊथ इंडस्ट्रीमधीलच नव्हे तर बॉलिवुडमधील सुद्धा मोठे नाव आहे. प्रकाश राज यांचा अभिनय नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालत असतो. विशेष म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही भुमिकांमध्ये त्यांचा हातखंड आहे. त्यामुळेच त्यांच्या चाहत्यांना त्यांचे चित्रपट नेहमीच आवडतात.

वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमुळे चर्चेत राहणाऱ्या प्रकाश राज यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मात्र फारसे कोणाला ठाऊक नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या लेखातुन प्रकाश राज यांच्या फारशा माहित नसलेल्या गोष्टींबद्दल माहिती देणार आहोत. प्रकाश राज यांचे पहिले लग्न साऊथ इंडस्ट्रीमधील अभिनेत्री ललिता कुमारी सोबत झाले होते. त्यांच्यापासुन त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता. पण काही कारणास्तव त्यांच्या मुलाचा आकस्मित मृत्यू झाला ज्याचा प्रकाश राज यांना जबर धक्का बसला. त्यामुळेच त्यांचे त्यांच्या पत्नीसोबत भांडणे होऊ लागली होती. या भांडणाचा प्रभाव हळुहळु त्यांच्या नात्यावर पडु लागला आणि २००९ मध्ये प्रकाश राज आणि ललिता कुमारी यांचा घ*ट*स्फो*ट झाला.

पहिल्या पत्नीसोबत घ*ट*स्फो*ट झाल्यावर अभिनेता प्रकाश राज यांनी कोरियोग्राफर पोनी वर्मासोबत दुसरे लग्न केले. त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. पुन्हा एकदा मुलगा झाल्यामुळे प्रकाश राज खुप खुष झाले. सध्या ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खुप खुष आहेत. काही दिवसांपुर्वीच प्रकाश राज यांच्या गाडीचा अपघात झाला होता. त्यामध्ये प्रकाश यांना दुखापत झाल्यामुळे त्यांची सर्जरी करण्यात आली. या संदर्भातील माहिती स्वता प्रकाश यांनी त्यांच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवरुन दिली. तब्येतीत सुधारणा झाल्यावर लवकरच ते त्यांच्या कामाला पुन्हा सुरुवात करणार आहेत.

प्रकाश राज यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांचा जन्म २६ मार्च १९६५ मध्ये कर्नाटकामध्ये झाला. त्यांना आतापर्यंत ५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ६ नांदी पुरस्कार, ८ तमिळनाडु राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ५ साऊथ फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांनी सिंघम, वॉंटेड यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *