कोरोना काळात अनेकांना सढळ हस्ते मदत करत त्यांना आधार देणारा अभिनेता म्हणजे सोनू सूद. चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिका साकारणारा हा अभिनेता खऱ्या आयुष्यात मात्र सर्वांसाठी हिरो ठरला आहे. लाखो लोकांसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या या अभिनेत्याच्या घरी अचानक आयकर विभागाने हजेरी लावली. आयकर विभागाचे अधिकारी कमाईपासून ते खर्चापर्यंत सोनू सूदच्या अकाउंट बुक सारख्या सर्व आर्थिक कागदपत्रांची तपासणी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वेक्षण लखनऊचे मोठे उद्योगपती अनिल सिंह यांच्याशी संबंधित आहे.

बुधवारी सोनू सूदशी संबंधित ६ परिसरांचे सर्वेक्षण केल्यानंतर आयकर विभागाची टीम १६ सप्टेंबर रोजी सकाळी पुन्हा अभिनेत्याच्या घरी पोहोचली आहे. बातमीनुसार, आयकर विभागाचे अधिकारी सोनू सूदच्या अकाऊंट बुकसारखी सर्व आर्थिक कागदपत्रे कमाई आणि खर्चाची तपासणी करत आहेत. आम आदमी पार्टीने सोनू सूदच्या घरी केलेल्या सर्वेक्षणावर नाराजी व्यक्त केली आहे.

वरील सर्वेक्षण हे लखनऊचे मोठे उद्योगपती अनिल सिंह यांच्याशी संबंधित असून अलीकडेच अनिल सिंग यांच्या कार्यालयावरही आयकर छापे पडले आहेत. सोनू सूद आणि अनिल सिंग या व्यवसायात भागीदार असल्याचे सांगितले जाते. आयकर विभागाची टीम सोनू सूदशी जोडलेल्या सर्व संस्थांची चौकशी करत आहे.

सोनू सूद सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय आहे, परंतु त्याने आयकर विभागाच्या या सर्वेक्षणासंबंधी अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. दुसरीकडे, दिल्लीचे मुख्यमंत्री या सर्वेक्षणामुळे संतापलेले दिसले. ते ट्विट करत म्हणाले- सत्याच्या मार्गावर लाखो अडचणी येतात, पण विजय नेहमीच सत्याचा असतो. सोनू सूद जी सोबत, भारताच्या लाखो कुटुंबांच्या प्रार्थना आहेत ज्यांना कठीण काळात सोनू जीचा पाठिंबा मिळाला.

काही दिवसांपूर्वी सोनू सूदला दिल्ली सरकारने शालेय मुलांसाठी सुरू केलेल्या मेंटॉरशिप कार्यक्रमाचा ब्रँड अँबेसडर बनवण्यात आले आहे. पूर्वी अशी चर्चा होती की सोनू आम आदमी पार्टीमध्ये सामील होणार आहे. तथापि, एका निवेदनात त्यांनी सर्व अटकळ फेटाळून लावली होती. मात्र यच्च दरम्यान अभिनेत्याने दिल्ली सरकारच्या कामांची प्रशंसा देखील केली होती.

२०२० मध्ये सुरू झालेल्या या धोकादायक साथीमुळे व त्यामुळे झालेल्या लॉकडाऊन दरम्यान, सोनू सूदने अनेक स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्याचे उदात्त काम सुरू केले. त्या काळापासून आजपर्यंत सोनू सुदद्वारा मदतीची प्रक्रिया अखंडपणे सुरु आहे. लोक सोशल मीडियावर सोनू सूदकडे मदतीसाठी विचारणा करतात आणि अभिनेता त्यांना लगेच मदत करतो. मग ते कोविडशी संबंधित असो किंवा इतर कोणत्याही समस्येशी संबंधित असो. एकदा सोनू सूदने हो म्हटल्यावर मदत लोकांपर्यंत पोहोचते. खऱ्या अर्थाने सोनू सूद या खडतर काळात या सर्वांसाठी मसीहा ठरला आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *