संपुर्ण बॉलिवुड टॉलिवुडमध्ये बाहुबली हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटातील सर्व कलाकार मंडळी रातोरात स्टार झाले होते. त्यांमध्ये सर्वाधिक कौतुक झाले ते अभिनेता प्रभासचे. आपला जोडीदार हा प्रभास सारखा असावा असे प्रत्येक मुलीच्या मनात येऊ लागले.

प्रभास हा एक दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याची फॅन फॉलोविंग ही हिंदी सिने दर्शकांमध्ये सुद्धा आहे. प्रभास हा साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे. पण बाहुबली चित्रपटाने त्याला विशेष ओळख मिळवुन दिली होती. त्यातील त्याच्या कामाचे खुप कौतुक करण्यात आले होते. तसाच दमदार अभिनय बाहुबली २ मध्ये सुदधा पाहायला मिळाला. या दोन्ही रेकॉर्ड ब्रेक चित्रपटांमुळे त्यांची फॅनफॉलोविंग भरपूर वाढली.

सध्या इंडस्ट्रीमधुन भलतेच वारे वाहु लागले आहेत. हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका कृति सेननचे मन प्रभासवर जडले आहे. प्रभास बद्दलचे मत कृति सेननने व्यक्त केले. तीने प्रभाससोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. एका इंटरव्ह्युमध्ये कृतीने तिच्या मनातील इच्छा बिंधास्तपणे बोलुन दाखवली.

एका इंटरव्ह्युमध्ये कृतिला तु कोणाला डेट करशील, कोणाशी फ्लर्ट करशील आणि कोणाशी लग्न करशील असे विचारले होते. त्यावेळी कृतीने तिन्ही कलाकारांसोबत केलेल्या कामांबद्दल सांगितले. तसेच त्यावेळी तिने दिलेले सुदधा खुप चर्चेत आला.

उत्तर देताना कृतीने सांगितले की ती कार्तिकसोबत फ्लर्ट कराल आणि टागरला डेट करेल, आणि विशेष म्हणजे प्रभाससोबत लग्न करेन असे जेव्हा ती म्हणाली तेव्हा सगळ्यांचे डोळे उंचावले. कृति म्हणाली कि माझी आणि प्रभासची केमिस्ट्री खुप चांगली आहे. प्रभास खुप लाजाळु असेल असा माझा सुरुवातीला समज होतो मात्र तो तसा बिलकुल नाही. तो खुप कुल व्यक्ती आहे.

कृतिने तर तिच्या मनातील इच्छा व्यक्त केली आता यावर प्रभासची काय प्रतिक्रिया येते याची सगळे प्रतिक्षा करत आहे. विशेष म्हणजे प्रभाससुद्धा सिंगल आहे. त्याने आतापर्यंत लग्न केलेले नाही. आदिपुरुष या चित्रपटात कृति आणि प्रभास एकत्र दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे काम चालु असुन हा चित्रपट श्री रामांच्या जीवनावर आधारित आहे.
आदिपुरुष या चित्रपटात प्रभास रामाच्या भुमिकेत दिसणार आहे तर कृति सीतेच्या भुमिकेत दिसणार आहे. तर या शिवाय अभिनेता सैफ अली खान रावणाच्या भुमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत करणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *