कामामध्ये व्यस्त असल्याने, राज कुंद्रा काय करत होता हे माहित नव्हते, शिल्पा शेट्टीने दिली पोलिसांना माहिती….
शिल्पा शेट्टी आणि तिचा परिवार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. शिल्पा शेट्टीचे पती उद्योजक राज कुंद्रा यांना पॉर्नोग्राफी केस प्रकरणी अटक करण्यात अली आहे. राज यांच्यावर अश्लील कंटेंट बनवणे आणि मोबाईल ऍप वर स्ट्रीमिंग करणे, हा आरोप आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. त्याचबरोबर शिल्पाचीही या प्रकरणी तासनतास चौकशी करण्यात आली आहे. १४०० पानांच्या आरोपपत्रानुसार अभिनेत्रीने पोलिसांना सांगितले की तिला कुंद्राच्या हालचालींकाहीच माहिती नव्हती. ती तिच्या कामात व्यस्त होती.

शिल्पा शेट्टी म्हणाली की मी कामात व्यस्त होती. राज कुंद्रा काय करत होता हे मला माहित नव्हते. शिल्पाने सांगितले की हॉटशॉट्स आणि बॉलीफेम ऍप्सबद्दल कोणतीही माहिती नाही. या दोन्ही ऍप्सचा संबंध या रॅकेटशी आहे. पोलिसांनी राजवर या ऍप्सवर अश्लील कंटेंट प्रसारित केल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी, गुगल प्लेस्टोर आणि ऍपल स्टोअरने हॉटशॉट काढून टाकले होते. मग त्या कंपनीने Bollyfame ऍप लाँच केले.

आरोपपत्रानुसार, व्यापारी राज कुंद्रा वियान इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आवारात रॅकेट चालवत असे. कुंद्राच्या काही सहाय्यकांनी या प्रकरणात त्याच्याविरुद्ध साक्ष दिली आहे. राज अश्लील चित्रपट बनवण्यात सामील होते, असे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावे असल्याचा दावाही गुन्हे शाखेने केला आहे. चित्रपटाच्या बदल्यात झालेल्या व्यवहारांचे पुरावेही पोलिसांना मिळाले आहेत. पोलिसांनी दावा केला आहे की, राज कुंद्रा यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान पॉर्न फिल्मची निर्मिती आणि प्रसारण करून १.२५ कोटी रुपये कमावले आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *