पोस्ट ऑफिसमध्ये अनेक छोट्या मोठ्या सेविंग स्किम असतात. तिथे जॉइंट अकाउंटसुद्धा उघडु शकतात. त्यातीलच एक म्हणजे मंथली इनकम स्कीम. या स्किमला जॉइन्ट अकाउंटचा जबरदस्त फायदा होतो. पोस्टाकडुन दिल्या जाणाऱ्या स्किममध्ये गुंतवणुकदारांना पैशांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही याची गॅरेंटी दिली जाते.
जाणुन घ्या काय आहे स्किम.
पोस्टाकडुन चालवल्या जाणाऱ्या स्किममध्ये पतिपत्नी दोघे मिळुन वर्षाला ५९४०० रुपयांची कमाई करु शकतात. या स्किमचे नाव पोस्ट ऑफिस मंथली सेविंग्स स्कीम (Post Office MIS) असे आहे. या स्किमद्वारे तुमची महिन्याला फिक्स कमाई होते. या स्किममार्फत तुम्ही महिन्याला ४९५० रुपये कमवु शकता. यात तुम्ही जॉइंट अकाउंटसुद्धा उघडु शकता. चला तर जाणुन घेऊ या स्किममध्ये तुम्हाला दुप्पट फायदा कसा होईल.
वर्षाला होईल इतकी कमाई – या स्किमधील जॉइंट अकाउंटद्वारे तुम्हाला दुप्पट फायदाा होऊ शकतो. या स्किम मध्ये गुंतवणुक केलेले पतीपत्नी वर्षाला ५९४०० रुपये कमावु शकतात.
काय आहे MIS स्कीम? या स्किममध्ये सिंगल आणि जॉइंट अशा दोन्ही प्रकारे अकाउंट ओपन केले जाऊ शकते. वैयक्तिक खाते ज्यावेळी उघडायचे असेल तेव्हा त्यात कमीतकमी १००० रुपयांपासुन ते जास्तीतजास्त ४.५ लाख रुपयांची गुंतवणुक करता येते. तसेच जॉइंट अकाउंटमध्ये जास्तीतजास्त ९ लाख रुपये गुंतवता येतात. ही योजना सेवानिवृत्त कर्मचारी तसेच वरिष्ठ नागरिकांसाठी खुप फायदेशीर आहे.
कोणकोणते फायदे मिळतात – या स्किमची चांगली गोष्ट म्हणजे यात दोन किंवा तीन व्यक्ती मिळुन खाते उघडु शकतात. या अकाउंट बदल्यात मिळणारे पैसे त्या खात्यात सहभागी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समान दिले जातात. तसेच हे जॉइन्ट अकाउंट सिंगल अकाउंटमध्ये बदलु शकतात. तसेच सिंगल अकाउंटला जॉइंट अकाउंटमध्ये बदलु शकतो. मात्र अकाउंटमध्ये कोणतेही बदल करते वेळी त्या खात्यातील सर्व सदस्यांचे जॉइंट एप्लिकेशन देणे आवश्यक असते.
कशी काम करते ही योजना – या स्किममध्ये दिलेल्या वेळेत ६.६ टक्के वार्षिक व्याज मिळते. या स्किम अंतर्गत जमा पैशांवर वार्षिक व्याजाच्या हिशोबावरुन रिटर्नची मोजणी केली जाते. यामध्ये तुमचा एकुण रिटर्न हे वार्षिक आधारावर असते. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या हिशोबाने त्याला १२ भागांमध्ये विभागले जाते. त्यातील अक हिस्सा तुम्ही दर महिना तुमच्या खात्यात मागवु शकता. जर तुम्हाला महिन्याला त्या पैशांची गरज नसेल तर मुख्य रक्कमेत ही रक्कम जोडुन त्यावर व्याज मिळु शकते.
कसा मिळेल इन्कम – समजा एखाद्या पतीपत्नीने या स्किममध्ये त्यांच्या जॉइंट अकाउंटमध्ये ९ लाख रुपया्ंची गुंतवणुक केली. ९ लाखांच्या जमावर ६.६ टक्के व्याज दराने वार्षिक रिटर्न ५९४०० रुपये मिळेल. हे पैसे १२ भांगांमध्ये विभागले तर महिन्याला ४९५० रुपये मिळतील. म्हणजेच तुम्ही महिन्याला ४९५० रुपये काढु शकता. तसेच तुमची मुख्य रक्कम पुर्णपणे सुरक्षित राहिल. हि स्किम तुम्ही ५ वर्षांनंतर आणखी ५-५ वर्षे वाढवु शकता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !