उत्तराखंडमधल्या एका छोट्याशा गावातुन येऊन संगित प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा पवनदिप राजन हा चांगलाच प्रिसिद्ध झाला आहे. त्याच्या जादुई आवाजानेच त्याला इंडियन आयडलच्या १२ व्या सीजनचा विजेता बनवला. पवनदिपला केवळ नाव आणि प्रसिद्धी मिळाली नाही तर त्याच बरोबर भरपुर सारा पैसा देखील मिळाला. पैशांसोबतच त्याच्यावर वेगवेगळ्या गिफ्टसाचा वर्षाव सुद्धा होत आहे. पवनदिप २०१६ पासुन उत्तराखंड सरकारचा युवा ब्रॅंड अॅंबेसिडर आहे. इंडियन आयडॉल जिंकल्यावर त्याची नेटवर्थ अजुन वाढल्याचे म्हटले जाते.
इंडियन आयडॉल पुर्वी पवनदिपने एण्ड टिव्हीवरील द व्हॉइस ऑफ इंडिया या शो मध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर त्याला वेगवेगळ्या ठिकाणी कामे मिळण्यास सुरुवात झाली होती व त्यातुन त्याला चांगला पैसा देखील मिळु लागला. इंडियन आयडॉल १२ जिंकल्यावर त्याला २५ लाख रुपये इनाम आणि स्विफ्ट कार मिळाली. त्याला १० ते २० लाख रुपये पगार आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याची संपत्ती १ ते २मिलीयन असल्याचे म्हटले जाते.
पवनदिपने काही दिवसांपुर्वीच एक्सयूवी 500 खरेदी केली. या व्यतिरीक्त इंडियन आयडॉल १२ जिंकल्यावर त्याची मैत्रीणी अरुणिताने त्याला एक ऑडी q7 कार गिफ्ट दिली. या कारची किंमत ७० लाखांपासुन सुरुवात होते. सोबतच त्याची मैत्रीण सयाली ने त्याला ७२ हजार रुपयांची सोन्याची चैन गिफ्ट केली. मोहम्मद दानिशने त्याला १४ लाख रुपयांची गिटार गिफ्ट केली.
काही दिवसांपुर्वी पवनदिपने त्याची मैत्रीण अरुणीता कांजीलाल हिच्या बिल्डींगमध्ये एक घर विकत घेतला. ज्यावेळी त्याने ते घर खरेदी केले त्यावेळी त्याला तु हेच घर का खरेदी केली असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी म्हणाला कि आम्ही सर्व मित्र परिवार आहोत. त्यामुळे आम्ही एकत्र राहणे चांगले आहे.
पवनदिप आणि अरुणिताच्या नात्याबद्दलही बऱ्याच चर्चा चालु आहेत. त्या दोघांना एकत्र पाहुन त्यांच्यात काहीतरी असल्याचे त्यांच्या चाहात्यांना नेहमीचवाटत असते. मात्र ते चांगले मित्र आहेत या स्टेटमेंटवर ते दोघेही ठाम असतात. एका इंटरव्ह्युमध्ये त्याने सांगितले कि गेल्या १० महिन्यात ते सगळेच एकमेकांचे खुप चांगले मित्र बनले आहेत.
अंतिम फेरीत पोहचलेले सर्वच स्पर्धक खुप टॅलेंटेड आहेत. पण आता सगळेच आपापल्या घरी निघुन जातील. आता आमच्याकडे सोबत राहण्याचे काहीच दिवस उरले आहेत. भलेही आम्ही सगळेच वेगवेगळ्या ठिकाणांहुन आलो असु मात्र आम्ही सर्व एक परिवार आहोत. सगळयांचीच खुप आठवण येईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !