फक्त ५ वर्षाच्या गुंतवणुकीवर मिळणार १४ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची सर्वाधिक फायदेशीर योजना !!

215

पोस्ट ऑफिसच्या अनेक विविध योजनांचा अनेक ग्राहक लाभ घेत असतात. सर्वच वयोगटातील ग्राहकांसाठी ह्या योजना असतात. या योजनांचा वापर करत अनेक जण स्वतःला आर्थिकरित्या सक्षम करू पाहत असतात. आपण ही जर कोरोनाच्या या संकटानंतर कुठे पैसे गुंतवू इच्छित असाल तर पोस्टाची नवी योजना आली आहे. पोस्ट ऑफिसची सर्वात फायदेशीर योजना, फक्त 5 वर्षांच्या गुंतवणूकीवर १४ लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळू शकेल, चला र जाणून घेऊया या योजनेबद्दल….

पोस्ट ऑफिसच्या या नव्या ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) मध्ये खाते उघडण्यासाठी वय वर्षे ६० असावे. या योजनेत फक्त ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेले लोकच खाते उघडू शकतात. या व्यतिरिक्त, ज्यांनी VRS (स्वेच्छानिवृत्ती योजना) घेतली आहे, ते लोक या योजनेत खाते देखील उघडू शकतात. जर ज्येष्ठ नागरिक या योजनेत १० लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली, तर दरवर्षी ७.४ टक्के (चक्रवाढ) व्याज दराने, ५ वर्षांनंतर म्हणजेच मॅच्युरिटी झाल्यावर, गुंतवणूकदारांना एकूण रक्कम १४,२८,९६४ रुपये असेल. म्हणजेच १४ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल. येथे व्याज म्हणून ४,२८,९६४ रुपयांचा फायदा होत आहे.

किती रुपये सह खाते उघडता येते?
या योजनेत खाते उघडण्यासाठी किमान रक्कम १००० रुपये आहे. या व्यतिरिक्त, या खात्यात जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम ठेवू शकत नाही. या व्यतिरिक्त, जर खाते उघडण्याची रक्कम एक लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही रोख रक्कम भरूनही खाते उघडू शकता. त्याचबरोबर, एक लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे खाते उघडण्यासाठी धनादेश भरावा लागतो.

मॅच्युरिटी किती असेल?
या योजनेचा परिपक्वता कालावधी ५ वर्षे आहे, परंतु गुंतवणूकदाराची इच्छा असल्यास ही वेळ मर्यादा देखील वाढविली जाऊ शकते. इंडिया पोस्ट वेबसाईट नुसार, मुदतपूर्तीनंतर ही योजना ३ वर्षांसाठी वाढवता येते. हे वाढवण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करावा लागतो.

करावर मिळते सूट
कराबद्दल बोलायचे झाल्यास, जर ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) अंतर्गत व्याजाची रक्कम वार्षिक १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल, तर टीडीएस कापण्यास सुरुवात होते. तथापि, आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत या योजनेतील गुंतवणुकीवर सूट देण्यात आली आहे.

संयुक्त खाते उघडता येऊ शकते
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) अंतर्गत, एक ठेवीदार वैयक्तिकरित्या किंवा त्याच्या जोडीदारासह एकापेक्षा जास्त खाती धारण करू शकतो. पण सर्वांनी मिळून कमाल गुंतवणूक मर्यादा १५ लाखांपेक्षा जास्त असू शकत नाही. खाते उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळी नॉमिनेशन सुविधा उपलब्ध आहे.

प्रीमॅचुर क्लोजिंग
हे खाते अकाली बंद करण्याची परवानगी आहे. परंतु पोस्ट ऑफिस खाते उघडल्याच्या १ वर्षानंतर खाते बंद केल्यावर ठेवीच्या १.५ टक्के कपात करेल, तर २ वर्षांनी खाते बंद केल्यानंतर १ टक्के ठेवीमधील रक्कम कापली जाईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !