कार सोबत असली कि कोणत्या गोष्टीची वाट बघायची गरज नाही, सुरु केली कि भुर्रकन निघालो. पण याच कारची जर किल्ली कारमध्ये राहून कार लॉक झाली की याहून त्रासदायक गोष्ट कोणतीच नाही, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पण यावरचं उपाय आज आम्ही घेऊन आलो आहोत. कारमध्ये चावी राहून चावी राहून कार लॉक झाल्यास आपण काय करायला हवे? चला तर पाहूया…..

बिना चवीचा देखील दरवाजा आपण खोलू शकतो. प्रत्येक कार अनलॉक करण्याची पद्धत वेगळी असते. जवळजवळ सर्व नवीन मॉडेल्समध्ये पॉवर लॉकिंग सिस्टीम देण्यात आली आहे, जी फक्त रिमोट कंट्रोलद्वारे उघडता येते. जुन्या कारमध्ये हे काम व्यक्तिद्वारा केले जात असे. काही कारमध्ये, लॉकिंग नॉब दरवाजाच्या आतील बाजूस ठेवण्यात येते, तर काही कारमध्ये ती हँडलमध्ये असते.

ते उघडण्याचा मार्ग देखील कारच्या लॉकिंग सिस्टमवर आधारित असतो, ज्यात लॉकिंग नॉब उंचावून कार अनलॉक केली जाते. अशा कारचे दरवाजे उघडण्यासाठी प्रथम शूलेस घेऊन त्याच्या मध्यभागी एक गाठ बनवणे. आता हळू हळू दरवाजाच्या काठावरुन हळू हळू ती आतपर्यंत घेऊन जायची. त्या बांधलेल्या गाठीच्या फासात अडकवून वरच्या दिशेने ती उचलायची. ही होती पद्धत…

दुसरी पद्धत म्हणजे हँगरची तार. या तारेला एका बाजूने वाकवून दरवाजाच्या रबराच्या मध्यभागी घाला. नॉब वर येईपर्यंत प्रयत्न करत रहा.

तिसरी पद्धत म्हणजे प्लास्टिकची पट्टी मधून दुमडणे. यासाठी प्लास्टिकची लांब पट्टी घ्यावी लागेल. दरवाजाच्या बाजूने ती आत घाला आणि नॉब वरच्या दिशेने खेचा. लोखंडी रॉड आणि स्क्रूड्रिव्हरचाही वापर केला जाऊ शकतो. पेचकसद्वारे गाडीचा गेट खेचा आणि त्यात रॉड घालण्यासाठी जागा बनवा. रॉडच्या सहाय्याने नॉब वर खेचा. अशा विविध पद्धतींचा वापर करून आपण कार अनलॉक करू शकतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *