जगातल्या सर्वात श्रीमंत बीझनेस वुमन बद्दल बोलायचे झाल्यास त्यात नीता अंबानी यांचे नाव प्रकर्षाने घेतले जाते. भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी किती लग्झरी जीवन जगतात हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण यामध्ये त्यांची पत्नीदेखील कमी नाही. देशातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीची पत्नी असलेल्या नीता अंबानी त्यांच्या महागड्या आणि लग्झरी आयुष्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या करोडो रुपयांच्या साड्या, लाखो रुपयांची चहा, आणि महागडया सॅंडल्स, त्यांचे कार कलेक्शन, आणि त्यांच्या घरातील लग्न या सर्वच गोष्टी नेहमीच चर्चेत असतात. सध्याच्या काळात त्यांच्या लाइफस्टाइलला तोडच नाही असे म्हणावे लागेल.

मंडळी तुम्हाला ठाऊक आहे का की, नीता अंबानी या जगातील सर्वात महागडे पाणी पितात. तुम्हाला त्या पाण्याच्या एक लीटर बॉटलच्या किंमतीबद्दल आणि त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल समजले तर तुम्ही सुद्धा अचाट व्हाल. नीता अंबानी जे पाणी पितात त्या पाण्याच्या एका बॉटलची किंमत सुमारे 44 लाख रुपये असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या दिवसाची सुरुवात ही ३ लाख रुपयांच्या चहाने होते. त्या ज्या कपातुन चहा पितात त्या कपला सोन्याची बॉर्डर देण्यात आली आहे. त्या कपाच्या ५० पीसच्या सेटची किंमत ही दिड करोड रुपये असल्याचे म्हटले जाते.

नीता अंबानी स्वताला फिट आणि ताजेतवाने राखण्यासाठी ‘Acqua di Cristallo Tributo a Modigliani’ चे पाणी पितात. ही जगातील सर्वात महागड्या पाण्याच्या बाटल्यांपैकी एक आहे. ७५०ml पाण्याच्या बाटलीची किंमत ४४ लाखांहुनही अधिक आहे. ती बॉटल सोन्यापासुन बनली आहे. या बॉटल मधील पाणी फ्रांस मधील असते. या पाण्यात ५ ग्रॅम सोन्याची राख सुद्धा टाकली जाते असे देखील म्हणतात. ती राख माणसांच्या शरीरासाठी फायदेशीर असते. त्यामुळेच या पाण्याची किंमत जास्त असते.

२०१० मध्ये ‘Acqua di Cristallo Tributo a Modigliani’ चे नाव गिनीज बुक्समध्ये सर्वात महागडी बॉटल म्हणुन नोंदवण्यात आले होते. जगातली सर्वात महागडी बॉटल’ Cognac Dudognon Heritage Henri IV’ डिझाइन तयार करणारे डिझाइनर Fernando Altamirano नेच ही बॉटल तयार केली आहे. ही बॉटल जितकी सुंदर आहे त्याहुन अधिक सुंदर त्या बॉटलची लेदर पॅकेजिंग आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *