या अभिनेत्यामुळे अमिताभ बच्चन सोबत माधुरी दीक्षित कधीच काम करू शकली नाही !

107

बॉलिवुड इंडस्ट्री मध्ये आता पर्यंत अनेक अभिनेत्री येऊन गेल्या पण माधुरीची जागा कोणीच घेऊ शकलेले नाही. ९० च्या दशकात माधुरीने जे यश मिळवले ते आता पर्यंत कोणत्याच अभिनेत्रीने मिळवलेले नाही. पण एक यशस्वी अभिनेत्री असुनही तिने कधीच महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेले नाही. खरेतर यामागचे कारण अनिल कपुर असल्याचे म्हटले जाते. माधुरीने अमिताभ सोबत काम करु नये अशी अनिल कपुरची इच्छा होती.

माधुरीने तिच्या करीयरची सुरुवात ८० च्या दशकात केली होती. सुरुवातीच्या काळात तिचे फारसे चित्रपट चालले नाही. त्यामुळेच सुरुवातीच्या काळात कोणतेच अभिनेते तिच्या सोबत काम करु इच्छित नव्हते. करीयरच्या या कठिण काळात अनिल कपुरने माधुरीला साथ दिली. अनिलने माधुरीसोबत बेटा, रामलखन, हिफाजत, परिंदा, किशन-कन्हैयां, खेल आणि तेज़ाब यांसारखे चित्रपट केले. त्यानंतरच माधुरीला सुपरस्टारचा टॅग मिळाला.

सफलतेनेनंतर माधुरीला अमिताभसोबत काम करण्याची ऑफर मिळाली होती. मात्र अनिलने माधुरीला ही ऑफ नाकारण्यास सांगितले. कदाचित अनिल कपुर माधुरीच्या करीयरवर मालकी हक्क आहे असेच समजत होते. त्यामुळे माधुरीने अमिताभसोबत काम करु नये असे अनिल यांना वाटत असावे.

माधुरी अनिल कपुरचे म्हणणे टाळु शकत नव्हती. त्यामुळे माधुरीने अमिताभसोबत काम करण्याची ऑफर नाकारली. माधुरी आणि अनिल कपुर ही त्यावेळची सुपरहिट जोडी होती. अनिलसुद्धा त्याच्या चित्रपटाची हिरोईन माधुरीच असावी यासाठी दिग्दर्शकांकडे शिफारस करायचा. अशातच माधुरी अनिल कपुर यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चासुद्धा रंगु लागल्या होत्या. पण मध्येच अशी एक वेळ आली ज्यात माधुरीने अनिलसोबत दुरावा निर्माण केला. आणि हळु हळु त्याच्यासोबत चित्रपटांत काम करणे बंद केले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !