बॉलिवूडमधील बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांचा जुहू जवळील जलसा बंगला सर्व चाहते वर्गासाठी एक आकर्षणच आहे. मोठ्या जागेत असणारा हा बंगला १०,१२५ स्क्वेर फूट इतका आहे. अमिताभ बच्चन यांनी जलसा बंगल्याच्या शेजारील जागा स्टेट बँक ऑफ इंडियाला १५ वर्षांसाठी भाडेतत्त्वार दिली आहे. या जागेचे भाडे त्यांना १८.९० लाख दरमहा मिळणार आहे. स्टेट बँकेला ही जागा देण्यापूर्वी ही जागा सिटी बँकेकडे भाडे तत्त्वावर होती.

उपलब्ध माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्या प्रॉपर्टीच्या प्रति स्क्वेर फिटचे भाडे ६०० रुपये आहे, हे भाडे तेथील इतर जागांच्या भावापेक्षा अधिक प्रमाणात आहे. पूर्वी सिटी बँककडे हि जागा होती, सिटी बँकेने जून २०१९ मध्ये अग्रीमेंट संपल्यानंतर ही जागा खाली केली. Zapkey.com (डेटा एनालिटिक्स आणि रिसर्च फर्म) यांच्याकडून मिळालेल्या कागदपत्रांच्या मते, भाड्यासंबंधित अग्रीमेंट गेल्या महिन्यात २८ सप्टेंबरला रजिस्टर्ड झाले होते. यामध्ये ३०,८६,००० रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीसहित ३०,००० रुपये रेजिस्ट्रेशन फीस इतके पैसे देण्यात आले होते.

स्टॅम्प ड्युटीच्या मते, अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांनी ३१५० स्क्वेर फिट तळ मजलयाला असलेली ही जागा १५ वर्षांसाठी दिलेली आहे. प्रत्येकी ५ वर्षाने २५ टक्क्याने पैसे वाढतील. सुरुवातीच्या पाच वर्षांमध्ये १८,९०,००० रुपये दर महिना देणे आहे. यानंतर ५ वर्षांसाठी २३,६२,५०० आणि पुढील पाच वर्षांसाठी २९,५३,१२५ रुपये देणे असेल. स्टेट बँक ऑफ इंडियाने २.२६ करोड रुपये जमा केले आहेत जे जवळ जवळ १२ महिन्यांचे भाडे आहे.

SHK Ventures चे सीईओ संगीत हेमंत कुमार JVPD च्या मोठमोठ्या प्रॉपर्टीची डीलिंग करतात. त्यांचे म्हणणे आहे की, या प्रॉपर्टीसाठी मिळणार पैसा अगदी योग्य आहे. पुढे ते म्हणाले ही जागा सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांची आहे आणि त्यांच्या घराच्या जवळ देखील आहे. सोबतच ही जागा जुहूमधील कॉर्नरचे प्रमुख ठिकाण आहे. यासोबतच त्यांनी माहिती दिली की त्या ठिकाणी असलेल्या जागांचे भाडे ४०० ते ५०० रुपये प्रति स्क्वेर फूट इतके आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *