किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे. शरीराची योग्यरित्या काळजी घेणे हे किडनीचे काम असते. र*क्ता*तील अतिरीक्त व निरुपयोगी घटक निवडुन ते रक्तातून शोषुन घेऊन लघवी वाटे बाहेर काढणे हे किडनीचे महत्वाचे काम असते. किडनीचे जर नीट असेल तर आपले संपुर्ण शरीर निरोगी राहते. त्यामुळे किडनीची काळजी घेणे ती नीट स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. किडनीत जर कचरा जमा झाला तर त्यात टॉक्सिन जमा होतात त्यामुळे किडनीत स्टोन होण्याचा धोका वाढतो. त्यामुळेच या आजारांपासुन वाचण्यासाठी किडनीची योग्य काळजी घ्यावी. यासाठी आहारात योग्य पदार्थांचे सेवन करायला हवे.

लिंबु किडनी शुद्धीकरणाचे काम करतो – अनेक औषधी गुणांनी समृद्ध असलेल्या लिंबात विटामीन सी असते. हे विटामीन सी शरीरातील अनावश्यक पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. लिंबुपाणी पिऊव सुद्धा तुम्ही शरीरासाठी लिंबाचा फायदा करुन घेऊ शकता. या मुळे किडनी तर साफ होतेच पण त्याच सोबत किडनीमुळे होणारे आजार देखील दुर होतात.

लाल द्राक्ष – लाल द्राक्षांमध्ये विटामिन आणि खनिजे असतात. विटामिन सी, बी 6 आणि विटामिन ए यांचा समावेश असतो. एवढेच नव्हे त्यात आयरन, कैल्शियम, फोलेट आणि पोटेशियम यांचा देखील समावेश असतो. लाल द्राक्षाचे हे सर्व गुण किडनी साफ करतात.

आले – आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कैल्शियम, आयोडीन, आयरन व अन्य पोषक तत्व यांचा समावेश असतो. किडनीमधील अनावश्यक पदार्थ बाहेर काढण्यासाठी त्याचा वापर केला जातो.

कोथिंबीर – कोथिंबीरीत मॅगनीझ, आयरन, मैग्नीशियम, विटामिन सी,विटामिन के आणि प्रोटीन यांचा समावेश असतो. कोथिंबीरीचे सर्वच गुण हे किडनी साफ करण्यासाठी उपयोगी येतात. यासाठी खाण्याच्या पदार्थांमधुन किंवा कोशिंबीरमधुन कोथिंबीरीचे सेवन करावे.

दही – दह्यात प्रो*बा*यो*टि*क बैक्टीरिया चा मात्रा अधिक असते जी किडनी साफ करण्यासाठी उपयोगी असते. तसेच दह्यातील औषधी गुणधर्मांचा वापर अन्न पचन करण्यासाठी होतो. तसेच त्यामुळे इम्युनिटीपण स्ट्रॉंग बनते. आहारात दह्याचा समावेश केल्यास आरोग्यास ते उपयोगी असतेच शिवाय त्य़ामुळे किड़नी देखील निरोगी होते.

करवंदे – विटामिन सी युक्त करंद्यामध्ये एंटी ऑक्सीडेंट गुणचे गुण असतात. खनिजांमध्ये झिंक, आयरन आणि कैल्शियम असतात जे किडनी साफ करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे आहारात करवंदेचा समावेश केल्यास किडनी साफ आणि स्वस्थ होण्यास मदत होईल.

लाल शिमला मिरची – लाल शिमला मिरचीमध्ये अनेक पोषक तत्वे तसेच खनिजे असतात. जे किडनीतील अतिरीक्त पदार्थ दूर करण्यास मदत करतात. म्हणुन किडनी साफ ठेवायची असेल तर आहारात शिमला मिरचीचा वापर आवश्य करावा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *