पोस्टात अनेक वेगवेगळ्या स्किम येत जात राहतात. त्या स्किम तरुणांपासुन ते वृद्धापर्यंत सर्वांसाठीच असतात. सध्या सर्व जगावर कोरानाचे सावट घोंगावत आहे. या काळात तुम्ही जर पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर येत्या काही वर्षात तुम्ही नक्कीच लखपती बनु शकता. पोस्ट ऑफिसच्या सिनीयर सिटीझन सेविंग्स स्किममध्ये गुंतवणुक करणाऱ्यांना ७.४ टक्के दरावर व्याज मिळते. चला तर जाणुन घेऊ तुम्ही केवळ ५ वर्षात १४ लाख रुपये कसे कमावु शकता.

कोण उघडु शकते खाते – सीनियर सिटीजन सेविंग्स स्कीममध्ये खाते उघडण्यासाठीचे वय ६० असणे आवश्यक आहे. ६० किंवा त्याहुन अधिक वय असलेले लोक हे फक्त या स्किममध्ये खाते उघडु शकतात. याव्यतिरिक्त ज्या लोकांनी VRS (Voluntary Retirement Scheme)घेतली आहे असे लोक सुद्धा यामध्ये खाते उघडु शकतात.

१० लाखांहुन अधिक गुंतवणुक केल्यास मिळतील १४ लाख रुपये – सीनियर सिटीजन सेविंग्स स्कीममध्ये १० लाखरुपये एकत्र गुंतवल्यास वार्षिक ७.४ टक्के व्याज दरानुसार ५ वर्षांनी मेच्याोरिटीवर गुंतवणुकदारांना एकुण १४,२८,९६४ रुपये रक्कम मिळेल म्हणजेच १४ लाखांहुन अधिक. येथे तुम्हाला व्याजरुपी ४,२८,९६४ रुपयांचा फायदा होईल.

किती रुपये भरुन खाते उघडु शकता – या स्किममध्ये खाते उघडण्यासाठी कमीतकमी १००० रुपयांची गुंतवणुक करु शकता. तसेच या खात्यात १५ लाखांहुन अधिक रक्कम ठेवु शकत नाही. खाते उघडण्याची रक्कम तुमची १ लाखांहुन कमी असेल तर तुम्ही पैसे भरुन खाते उघडु शकता. पण जर तुम्ही १ लाखांहुन अधिक पैसे गुंतवत असाल तर तुम्हाला चेक द्यावा लागेल.

मॅच्युरिटी पिरियड किती असतो – या स्किमचा मॅच्युरिटी पिरियड ५ वर्षांचा असतो. पण गुंतवणुकदार त्यांचा हा कालावधी वाढवु देखील शकतात. इंडिया पोस्ट वेबसाईटनुसार मॅच्युरिटी पिरियडनंतर तुम्ही ३ वर्षांसाठी हा कालावधी वाढवुन घेऊ शकता. त्य़ासाठी तुम्हाला पोस्टात जाऊन अर्ज करावा लागतो.

टॅक्सवर मिळते सुट – या स्किममध्ये व्याजाची रक्कम ही वर्षाला १० हजारच्या वर जात असेल तर तुमचा टिडीएस कापुन घेतला जातो. या स्किममधील गुंतवणुकीवर इन्कम टॅक्स अॅक्ट सेक्शन ८० सी च्या अंतर्गत सुट मिळते.

जॉइंट अकाउंट उघडु शकता – या स्किम अंतर्गत तुम्ही वैयक्तिक किंवा पति-पत्नी जॉइंट अकाउंट पन करु शकतात . पण येथे सर्व मिळुन अधिकाधिक इन्हवेस्टमेंट लिमिट १५ लाखांपेक्षा जास्त ठेवु शकत नाही. खाते उघडतेवेळी तसेच बंद करते वेळी सुद्धा नॉमिनेशन फॅसिलिटी उपलब्ध असते.

प्रिमॅच्युअर क्लोजिंग – या स्किममध्ये प्रिमॅच्युअर क्लोजिंगला परवानगी आहे. पण खाते उघडल्यावर एका वर्षाने खाते बंद केल्यास त्यावर १.५ टक्के डीपॉझिट कापले जाईल. आणि जर दोन वर्षांनी खाते बंद केल्यास १ टक्का डिपोझिट कापले जाईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *