या दिग्गज अभिनेत्यासोबत अफेयर केल्यानंतर अभिनेत्री करिष्मा कपूर आता राहते एकटीच !

81

कुपर खानदानाची कन्या अभिनेत्री करिश्मा कपुर ही सध्या बॉलिवुड चित्रपटांपासुन दूर असली तरी तिच्या चाहत्यांच्या संख्येत कमी झालेली नाही. ९० च्या दशकात आपल्या अदाकारीने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या करिश्मा कपूरने त्यावेळी सुपरहिट चित्रपट दिले. करिश्माने १९९१ मध्ये प्रेम कैदी या चित्रपटातुन तिच्या करियरला सुरुवात केली होती . या चित्रपटात तिच्यासोबत हरिश कुमार, रामा विज आणि परेश रावल यांच्या भुमिका होत्या. करिश्माचे प्रोफेशनल आणि वैयक्तिक असे दोन्ही आय़ुष्य चर्चेत होते. करिश्मा सध्या ४७ वर्षांची असुन एकटीच जीवन जगत आहे. आज आम्ही तुम्हाला करीश्माचे कोणाकोणासोबत अफेअर होते याबद्दलची माहिती देणार आहोत.

अजय देवगण – एकेकाळी तरुणवर्गांत अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री करीश्मा कपुर यांची जोडी खुप प्रसिद्ध होती. जिगर चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान त्या दोघांमधील जवळीक खुप वाढली होती. अनेकदा या दोघांना एकत्र देखील पाहिले गेले होते. त्यामुळे त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चासुद्धा खुप व्हायच्या. पण काही काळाने त्या दोघांनी दूर राहणे पसंत केले.

गोविंदा – बॉलिवुडमध्ये गोविंदा आणि करिश्मा यांची जोडी सुपरहिट होती. या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आणि ते सगळेच सुपरहीट झाले. या काळात त्यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा देखील सुरु झाल्या होत्या. या अफावांमुळे या दोघांनी दुर राहणे पसंत केले.

सलमान खान – बॉलिवुडचा दबंग म्हणजेच सलमान खानने सुद्धा करीश्मासोबत काम केलेले आहे. त्यामध्ये दुल्हन हम ले जाएंगे, जुड़वा आणि हम साथ साथ हे यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. करिश्माचे नाव सलमानसोबत सुद्धा जोडले गेले आहे. परंतु यावर त्या दोघांनी काहीच सांगितले नाही.

अभिषेक बच्चन – बॉलिवुडचे बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत सुद्धा करीश्माचे अफेअर होते. असे म्हटले जाते की त्या दोघांचा साखरपुडा देखील झाला होता पण तो काही कारणास्तव तुटला. ५ वर्षे एकमेकांसोबत राहिल्यावर त्यांनी आपापला मार्ग वेगळा केला.

संजय कपुर – बॉलिवुडच्या बड्याबड्या स्टारस् सोबत अफेअर केल्यावर करिश्माने २००३ मध्ये बिझनेसमन संजय कपुरसोबत लग्न केले. मात्र हे लग्न जास्त काळ टिकु शकले नाही. लग्नानंतर ४ वर्षांनी त्यांचा घ*ट*स्फो*ट झाला.

संदिप तोषनीवाल – संजय कपुरसोबत घ*ट*स्फो*ट घेतल्यावर २ वर्षे करिश्मा एकटीच होती. त्यानंतर तिचे नाव बिझनेसमन संदिप तोषनीवालसोबत जोडले जाऊ लागले. करिश्मा संदिपला डेट करत असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. पण आता मात्र ती तिचे आय़ुष्य तिच्या मुलांसोबत एकट्यानेच घालवत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !