७० वर्षांपुर्वी भारतात एक प्रोडक्ट लॉन्च झाले होते. हे प्रोडक्ट एका राजकिय नेत्याच्या सांगण्यावरुन देशाच्या एका दिग्गज इंडस्ट्रलिस्टने बनवले होते. ते प्रोडक्ट होते महिलांसाठीचे ब्युटी प्रोडक्ट. या लोकल प्रोडक्टची डिमांड देशाचे पुर्व प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु यांनी केली होती. तर जे आर डी टाटा या इंडस्ट्रलिस्टला त्यांनी ते प्रोडक्ट बनवण्याची ऑर्डर दिली होती. आणि ते प्रोडक्ट दुसरे तिसरे कोणते नसुन आताच्या काळातील प्रसिद्ध प्रोडक्ट लॅक्मे होतं.
देशात सौंदर्याला पुर्वापार पासुन महत्व दिले गेले आहे. शाळेत असताना अंलकार हा प्रकार शिकवला जायचा. शाब्दिक अलंकार भाषेचे सौंदर्य वाढवतात तर ब्यूटी प्रोडक्ट्स स्त्रियांचे सौंदर्य वाढवतात. एकुणच काय तर सुंदरता या विषयाने ७० वर्षांपुर्वीपासुन स्थान भक्कम ठेवले आहे. त्यामुळेच ७० वर्षांपुर्वी लॅक्मेचे ब्युटी प्रोडक्ट किट लॉन्च झाले होते. आजच्या काळात देशातील महागड्या ब्यूटी प्रोडक्ट्सला मात देणारा हा ब्रॅण्ड देशाची ओळख बनला आहे.
लॅक्मेचे प्रोडक्ट हे पॉकेट फ्रेंडली आहेत, त्यांची क्वालिटी पण उत्तम आहे. त्यामुळेच लॅक्मे हे भारतातील सर्वाधिक विकले जाणारे ब्युटी प्रोडक्ट आहे. लॅक्मे सुरु होण्यापुर्वीचा किस्सा खुपच रंजक आहे. हा किस्सा पंडित जवाहर लाल नेहरू, टाटा आणि मां लक्ष्मी यांच्याशी निगडीत आहे. आजपासुन ७० वर्षांपुर्वी म्हणजेच १९५२ मध्ये लॅक्मेचे लॉन्च झाले होते. याचे श्रेय जेआरडी टाटा या्ंना दिले जाते.
१९५० पर्यंत मध्यम वर्गातील स्त्रिया सजण्यासाठी किंवा तयार होण्यासाठी घरगुती ब्युटी प्रोडक्टस् चा वापर करायचा. तर ज्या महिला श्रीमंत होत्या त्या विदेशातुन ब्युटी प्रोडक्टस् मागवायच्या. त्यामुळे देशातील रुपया विदेशात जाण्याचा हा एक मुख्य स्त्रोत होता. शिवाय त्याकाळात प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु देशातील नव्या उद्योग स्थापनेवर काम करत होते.
तेव्हा त्यांना भारतीय ब्युटी ब्रॅण्ड सुरु करण्याची कल्पना आली. शिवाय त्यावेळी इतर कोणता ब्युटी ब्रॅण्ड देखील नव्हता त्यामुळे बजेट फ्रेंडली प्रोडक्ट काढले तर लोक त्याला खरेदी देखील करतील आणि त्यांच्याशी कोणाची स्पर्धा देखील नसेल. त्यांची ही कल्पना त्यांनी जेआरडी टाटा यांना सांगितली . उद्योगांची चैन सुरु करण्यात टाटा खुप माहिर होते. नेहरु यांची ही कल्पना टाटा यांना खुप आवडली आणि इथुनच सुरु झाला लॅक्मेचा प्रवास. पण या ब्रॅण्डच्या नावावर त्यावेळी वाद देखील झाले. आज आपण ज्या प्रोडक्टला लॅक्मे असे म्हणतो ते पुर्वी लक्ष्मी म्हणुन प्रसिद्ध होते.
तुम्ही गुगल वर सर्च केलात तर १९५२ आणि त्याच्यानंतर देखील काही वर्षांपर्यंत लक्ष्मी नावाच्या प्रोडक्टस् ची चांगली रेंज पहायला मिळेल. लक्ष्मीच्या जाहिरातीत रेखा, हेमा मालिनी, जया प्रदा यांसारख्या अभिनेत्री होत्या.लक्ष्मी प्रोडक्ट लॉन्च झाल्यावर भारतात विदेशी प्रोडक्ट येणे जवळपास बंदच झाले होते. चित्रपटांमध्ये देखील लक्ष्मी चे ब्युटी प्रोडक्टस् वापरले जायचे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये या प्रोडक्ट बद्दलचा विश्वास वाढला होता.
विशेष म्हणजे या ब्रॅण्डने त्यांच्या प्रोडक्टस् च्या किंमती जास्त ठेवल्या नव्हत्या. त्यामुळे मध्यम वर्गीय महिला देखील त्यांचा वापर करु शकत होत्या. लक्ष्मीच्या लॉन्च नंतर ५ वर्षांतच तिने उच्च पद मिळवावे असे टाटा यांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न आज देखील सत्यात उतरलेले दिसते. त्यावेळी देशात इतर उद्योगांची देखील स्थापना केली जात होती.
टाटा यांच्या कडे अनेक संधी येत होत्या त्यामुळे १९६० ला त्यांनी लक्ष्मीला विकायला काढले. अनेक नामांकित कंपन्यांनी हा ब्रॅण्ड विकत घेण्यासाठी बोली लावली. पण यात हिन्दुस्तान लीवरने नंबर पटकावला. टाटा यांना देखील हिन्दुस्तान लीवर कंपनीवर पुर्ण विश्वास होता कि ती लक्ष्मीला आणखी पुढे घेऊन जाईल. १९६६ मध्ये हिन्दुस्तान लीवरने लक्ष्मीला विकत घेतले आणि तिचे नाव देखील बदलण्यात आले. लक्ष्मीचे नाव बदलुन लॅक्मे करण्यात आले. लक्मे हे एक फ्रेंच नाव असुन त्याचा अर्थ मात्र लक्ष्मी असाच होतो. याचाच अर्थ या प्रोडक्टस् चे नाव जरी बदलले असले तरी अर्थ मात्र तोच होता.
२०१८ भारताचे ब्यूटी एंड पर्सनल केयर मार्केट ९७१०० करोड रुपयांचे झाले आहे. तर कलर्ड कॉस्मेटिक ८००० करोड रुपयांचा आहे. स्किन केअरची किंमत १२५०० करोड रुपये असल्याचा अंदाज आहे.२०२२ पर्यंत कलर्ड कॉस्मेटिकचे मार्केट १७.४ टक्के गतीने वाढण्याची शक्यता आहे. तर स्किन केअर मार्केट १०.४ टक्के दराने वाढु शकतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !