कामच्या ठिकाणी काम करतेवेळेस झोप येणे हे काय़ नवे नाही. शरीर जेव्हा थकलेले असते त्यावेळेस झोप येतेच. काही वेळेस झोप इतकी अनावर होते की आजुबाजुला कोणती जागा आहे याचे आपल्याला भानच राहत नाही. आणि आपण बसल्या बसल्या डुलक्या खाऊ लागतो. मात्र इथे प्रश्न असा आहे की बसल्या बसल्या झोपणे शरीरासाठी योग्य आहे का ?.. झोपण्याची पद्धत ही झोपेवर आणि स्वास्थ्यावर फरक पाडते. त्यामुळे बसुन झोपण्याचे काय फायदे आणि काय नुकसान आहे ते जाणुन घेऊ..

बसुन झोपल्यास कोणते फायदे होतात – 
गर्भावस्थेत आरामदायक – गर्भवती स्त्रीया त्याच्या पोटाला त्रास होणार नाही अशी उपयुक्त आणि आरामदायक स्थिती नेहमी शोधत असतात. बसल्या बसल्या झोपल्यास त्यांच्या पोटाला आराम आणि सहारा मिळतो. त्यामुळे ती स्थिती त्यांच्यासाठी फायदेशीर असते.

स्लीप एपनियामध्ये मदत – काहींना झोपेत श्वास घ्यायला त्रास होतो. त्याला स्लीप एपनिया असे म्हणतात. अशावेळी बसल्या बसल्या झोपल्यास ऑब्सट्रक्टिव स्लिप एपनियाची लक्षणे कमी करण्यास मदत होते.

अॅसिड रिफलक्समध्ये मदत – बसल्यामुळे अन्ननलिकेस मदत होते. त्यामुळे ज्यांना गॅस्ट्रइंटेस्टाईनची आणि पचनासंबंधी समस्या असतील तर त्यांना बसल्या बसल्या झोपेचा फायदा होतो.

बसल्या बसल्या झोपल्यामुळे होणारे नुकसान –
पाठ दुखीची शक्यता – बसल्यावर जास्त काळ झोपल्यामुळे शरीर एकाच स्थितीत रहाते. त्यामुळे पाठदुखी आणि शरीर मो़डुन त्रास होतो.

स्नायुंमध्ये अकड – कमी गतिशिलतेमुळे स्नायु आकडु शकतात. झोपल्यामुळे शरीर ताणले जाते. तर बसुन झोपल्यामुळे शरीराची अशाप्रकारची हालचाल होत नाही.

रक्ताभिसरणास त्रास – खुप काळासाठी एकाच स्थितीत बसल्यास रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही.

बसुन झोपल्यामुळे मृत्यू होऊ शकतो का ? तज्ज्ञांच्यामते बसुन खुप वेळासाठी झोपल्यास शरीरातील रक्तवाहिन्या संकुचित पावतात. त्यामुळे शरीराच्या खालच्या भागात म्हणजेच पायांत किंवा जांघेतील रक्तवाहिन्यामध्ये रक्ताचे थर जमा होण्याचा धोका असतो. हा धोका खुप काळासाठी एकाच पोझिशनमध्ये झोपल्यास देखील होऊ शकतो. याकडे नीट लक्ष न देल्यास पुढे जाऊन ते खुप घातक ठरु शकते. यामुळे मृत्यू पण होऊ शकतो.

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *