थायरॉईडच्या आजाराने ग्रस्त आहात तर मग आहारात करा फक्त या गोष्टीचा समावेश, थायरॉईड येईल पूर्णपणे नियंत्रणात !

120

सध्याच्या धावपळीच्या दुनियेत सगळ्यांचे जीवन धकाधकीचे झाले आहे. याचा थेट परिणाम माणसांच्या आरोग्यावर होऊ लागलेला आहे. सध्या लोकांना मुळव्याध, जाडेपणा, शुगर, कॅंसर यांसारख्या आजारांनी ग्रासले आहे. त्यातीलच आणखी एक आजार म्हणजे थायऱॉइड. ऐकायला हा सर्वसामान्य आजार वाटतो. पण थायरॉइडने ग्रस्त लोकांना हा आजार जीवघेणा ठरु शकतो. तुम्हाला जर तुमच्या शरीरात काही त्रास जाणवत असेल तर तुम्हाला त्वरीत डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे.

कोणताही आजार असलेल्या व्यक्तींना त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींसोबत त्यांची दिनचर्या बदलणे आवश्यक असते. आरोग्याच्या बाबतीत एक जरी चुकीचे पाऊल उचलले गेले तर त्याचे परिणाम पुढे भंयकर भोगावे लागतात. थायरॉइड सारख्या आजारात तर थोडीशीपण चुक खुप महागात पडु शकते. आज आम्ही तुम्हाला थायरॉइडसंबधी काही उपाय सांगणार आहोत.

थॉयरॉइड झालेल्या व्यक्तीला त्यांच्या शरीरातील आयोडीनची चाचणी करुन घेणे आवश्यक असते. शरीरातील मेटाबॉलिज्म योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी शरीरात आयोडीन असणे आवश्यक आहे. शरीरातील आयोडीनची मात्रा कमी होऊ देऊ नये. वेळच्यावेळी तज्ज्ञांनाचा सल्ला घ्यावा.

गाजर, अंडी यांच्यामध्ये विटामिन ए असते त्यामुळे त्यांचे सेवन अधिक करावे. तसेच जेवणात हिरव्या भाज्या, व पौष्टीक पदार्थांचा समावेश करावा. शरीरात आवश्यक असणाऱ्या बॅक्टेरिया दही आणि सफरचंदामुळे निर्माण होतात त्यामुळे ते जास्त खावे.

रोज अर्धा तास हलासन, मस्त्यासन आणि सर्वांगासन यांसारखे प्राणायाम करावेत. जे शरीरासाठी खुप आवश्यक असतात.
थायरॉइडने ग्रस्त असलेल्यांना काळी मिरी चे सेवन करणे गरजेचे आहे. काळी मिरी थायरॉइड हार्मोनला कंट्रोल करण्यासाठी मदत करते. यासाठी तुम्ही ती काळी मिरीची पुड करुन खाऊ शकता किंवा ती नुसती सुद्धा खाऊ शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.