या कारणामुळे सलमान आणि शाहरुख यांची होती जाणी दुश्मनी आणि आता परत झालेत जबरी दोस्त !

83

अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांनी अनेक दशके बॉलिवुड़वर राज्य केले आहे. मात्र या दोघांनी १९९५ मध्ये करण अर्जुन या ब्लॉक बस्टर चित्रपटात काम केले होते व तिथेच त्यांची घनिष्ट मित्र बनले. या दोघांच्या नात्यात सुद्धा इतर नात्यांप्रमाणे अनेक चढउतार आले. पण पुन्हा एकदा ते एक झाले. काही दिवसांपुर्वीच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली तेव्हा शाहरुखला भेटायला जाणारा पहिला सलमान खानच होता.

शाहरुखच्या वाईट काळात साथ देऊन सलमान खानने साथ देऊन त्याची मैत्री निभावली होती. मध्यंतरी एक काळ असा होता जेव्हा सलमान आणि शाहरुख एकमेकांचे तोंड देखील बघत नव्हते. चला तर जाणुन घेऊ कोणत्या कारणामुळे त्यांच्यात दुरी आली.

खऱ्या आयुष्यात सुद्धा करण अर्जुन झाले होते – करण अर्जुन च्या यशानंतर फॅन्संनी सलमान खान आणि शाहरुख खानला खऱ्या आयुष्यातील करण अर्जुन मानले होते. इंटरव्ह्युमध्ये देखील त्यांना अनेकदा एकत्र पाहिले होते. तसेच शाहरुखचा कुछ कुछ होता हे सलमानचा हर दिल जो प्यार करेगा यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी पाहुणे कलाकार म्हणुन काम केले होते.

२००८ मधील घटनेमुळे तुटली मैत्री – मात्र २००८ साली सलमान खानची पुर्व प्रेयसी कतरीना कैफच्या बर्थडे पार्टीमध्ये या दोघांचे मोठे भांडण झाले. त्यानंतर या दोघांत शी’त’यु’द्ध सुरु झाली. या पार्टीत उपस्थित असलेल्या अमीर खानने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

२०१४ ला एकमेकांना मिठी मारली – अनेक वर्षे एकमेकांशी अबोला धरल्यानंतर २०१४ च्या मुंबईत झालेल्या बाबा सिद्दकीच्या वार्षिक इफ्तार पार्टीला या दोघांचे पुन्हा एकदा समेट झाले. त्या दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या हात मिळवणी केली आणि एकमेकांना मिठी मारली. तो एक असा क्षण होता जो सलमान किंला शाहरुखचा फॅन कधीच विसरु शकत नाही.

सलमान आणि शाहरुख यांचे अतुट नाते – जेव्हा सलमानला त्याच्या व शाहरुखच्या पु्न्हा झालेल्या मैत्री बद्दल विचारले गेले तेव्हा तो म्हणाला कि केवळ बाबाच करु शकतात. त्या पार्टीनंतर शाहरुख आणि सलमान अतुट नात्यात बांधले गेले. सलमानच्या ५३ व्या वाढदिवसाला शाहरुख सत्ते पे सत्ता चित्रपटातील ये प्यार हमे किस मोड पे ले आया हे गाणे गातानाचा व्हिड़ीओ व्हायरल झाला होता.

या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र दिसले – या दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांच्या चित्रपटांचे प्रमोशन केले होते . सलमान शाहरुखच्या जिरो चित्रपटात विशेष भुमिकेत दिसला होता. तसेच शाहरुखच्या पठाण चित्रपटात देखील सलमान दिसणार असल्याचे म्हटले जाते.

शाहरुखच्या वाईट काळात सलमान पाठीशी – काही दिवसांपुर्वीच शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स पार्टीप्रकरणी एनसीबीने अटक केली होती. त्यावेळी सलमानने शाहरुखची त्याच्या मन्नत बंगल्यावर जाऊन भेट घेतली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !