विराट कोहली हा जगातील सर्वोतम क्रिकेटपटु म्हणुन ओळखला जातो. पण त्याचा हा प्रवास इतका सहज सोप्पा नव्हता. त्यासाठी त्याला खुप कष्ट देखील करावे लागले.स्वताच्या मेहनतीवर व ताकदीवर तो आजच्या स्थानावर पोहचला आहे. आज आम्ही तुम्हाला कोहली किती कमावतो ते सांगणार आहोत.

४६ मिलियन डॉलरचा मालक आहे विराट – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ४६ मिलियन डॉलरचा म्हणजेच ३०५ करोड ५७ लाख रुपयांचा मालक आहे. सध्या विराट मैदानासोबतच मैदानाबाहेरील सुद्धा महागडा खेळाडु झाला आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न ३.१ मिलीयन करोड डॉलर आहे.

सामन्यांमधुन एवढे कमावतो कोहली – मिडिया रिपोर्टस् नुसार आयपीएलमध्ये कोहली सध्या धोनी पेक्षापण जास्त फि घेतो. धोनीला वर्षाला जिथे १२.५ करोड रुपये मिळतात तिथे कोहलीला १५ करोड रुपये मिळतात. करोडो रुपये तर विराट केवळ आयपीएल मधुनच कमावत असतो.

श्रीमंत अॅथलेटीक्सच्या यादीत कोहली सहभागी – जगातील सगळ्यात श्रीमंत अॅथलीटक्सच्या यादीत जगातील एकमेव क्रिकेटर सहभागी आहे तो म्हणजे विराट कोहली. फोर्ब्सने २०१७ मध्ये श्रीमंत अॅथलेटीक्सची यादी जाहिर केली होती. त्या यादीत विराटचे नाव ८९ व्या स्थानावर होते. कोहलीचे वार्षिक उत्पन्न १४३ करोड रुपये आहे.

जाहिरातींमध्ये करतो १०० कोटींची कमाई – वर्ल्ड क्रिकेटचा हिरो विराट कोहली जाहिरातींमध्ये १०० करोडच्या क्लबमध्ये सहभागी आहे. काही दिवसांपुर्वीच त्याने स्पोर्टस् अॅक्ससरीज बनवणाऱ्या प्रसिद्ध ब्रॅण्ड पुमा सोबत १०० करोड रुपयांची डिल साईन केली. विराट जाहिरातींसाठी प्रतिदिवस ५ करोड रुपये चार्ज घेतो. सध्या कोहली १८ ब्रॅण्डस् चा प्रचार करतो.

पिण्याच्या पाण्याची किंमत ६०० रुपये – विराटच्या फिटनेसमध्ये पाण्याची सुद्धा महत्वाची भुमिका आहे. विराटचे पाणी देखील खास असते. तो एविएन नावाचे मिनरल वॉटर पितो. ते पाणी खास फ्रांसवरुन मागवले जाते. या पाण्याच्या एक लीटर बॉटलची किंमत तब्बल ६०० रुपये आहे. स्वताला फिट ठेवण्यासाठी विराट खुप मेहनत घेतो हे आपण जाणतोच. त्यासाठी तो नेहमी प्रोटीन युक्त खातो. त्याच्या रोजच्या आहारात सैलेड, डेली लैंब मीट आणि सैलमन फिशचा समावेश असतो.

मुंबईत घेतले ३४ करोड रुपयांचे घर – विराटने मुंबईतील वरळी येथे ३४ करोड रुपयांचे घर घेतले. त्य़ाचे घर लक्सुरियस काम्प्लेक्स मध्ये 35व्या मजल्यावर आहे.तसेच कोहलीने दिल्ली गुरुग्राम येथे एक विला खरेदी केला आहे तिथे त्याचा परिवार राहतो.

बिझनेस मध्ये देखील हुशार आहे कोहली – कोहली एक क्रिकेटर सोबतच एक यशस्वी बिझनेमन सुद्धा आहे. विराटला क्रिकेट सोबत फुटबॉल देखील आवडतो. त्यामुळे त्याने आईएसएल टीम एफसी गोवा खरेदी केली आहे. नीलेश भटनागर आणि सचिन गडोयासोबत विराट ITPL मध्ये यूएई रॉयल्स टीमचा सह-मालक आहे. कोहलीने चिलज नावाने जीम आणि फिटनेस सेंटर लॉन्च केले आहे. तसेच ‘रॉग्न’ (Wrong) नावाच्या कपड्यांच्या ब्रॅण्डसोबतसुद्धा तो सलग्न आहे. तसेच त्याने रेस्ट्रॉंन्टचा सुद्धा बिझनेस सुरु केला आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *