सध्या सगळ्यांना वेध लागले आहेत ते दिवाळी या सणाचे. सर्वत्र दिवाळीच्या तयारीला जय्यत सुरुवात झाली आहे. घराघरातुन फराळाचे खमंग सुगंध दरवळु लागला आहे. मार्केटमध्ये रांगोळी , कंदील , दिवे, लाईटींगची खरेदी जोरात चालु आहे. या सर्व गोष्टींसोबत आणखी एक गोष्ट दिवाळीच्या वेळी खेरदी केली जाते ती म्हणजे झाडु. दिवाळीच्या वेळी झाडु खरेदी करणे शुभ मानले जाते.

असे म्हणतात कि दिवाळीच्या दिवशी झाडु खरेदी करुन तिची पुजा करावी व त्याच्या दुसऱ्या दिवशी ती वापरायला काढावी. झाडुचा वापर योग्य़ प्रकारे केल्यास आय़ुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. यामागे काही कारणे देखील आहेत.
असे म्हटले जाते कि झाडुचा अपमान केल्यास तो देवी लक्ष्मीचा अपमान मानला जातो. त्यामुळेच झाडुला चुकुन पाय लागल्यास त्याच्या पाया पडले जाते.

असे म्हणतात कि झाडु मध्य़े देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे दिवाळीच्या वेळी देवी लक्ष्मीचा वास हवा असेल तर मंदिरात शुभ मुहुर्तावर झाडु दान करावी. दिवाळीच्या कोणत्याही दिवशी तुम्ही झाडु खरेदी करु शकता. मात्र शनिवारी झाडु खरेदी करु नये ते अशुभ मानले जाते.

तुम्ही नव्या घरात प्रवेश करत असाल तर त्यावेळी झाडु घेऊनच करावा. झाडु मोकळ्या जागी उघडी ठेवणे अशुभ असल्याचे म्हटले जाते. घराच्या मुख्य दारातुन झाडु दिसणार नाही अशा जागी ती ठेवावी. झाडुचा उपयोग नसेल तेव्हा ती नजरेसमोर ठेवु नका. तसेच उत्तर दिशेला झाडु ठेवावी.

देवघर, बेडरुम, स्टोअर रुम अशा ठिकाणी झाडु ठेवु नये. बेडरुममध्ये झाडु ठेवल्यास वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. याशिवाय झाडु कधी उभी ठेवू नका. खुप काळ वापरात असलेली झाडु घरात ठेवु नये. त्याजागी नवी झाडु ठेवावी. कधीही झाडुला ओलांडुन जाऊ नये. तसेच झाडुला कधी जाळु नये. त्यामुळे देवी लक्ष्मीचा अपमान होऊ शकतो. त्यामुळे झाडुचा कधीच कोणत्याही प्रकारचा अपमान करु नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *