या दोघांचे नाते ऐकून विश्वास बसणार नाही – अनेक असे कलाकार असतात ज्यांना आपण कार्यक्रमांमध्ये, मालिकांमध्ये अनेक विविध भूमिका साकारताना पाहत असतो. यापैकी अनेक कलाकारांचे एकमेकांशी नातेसंबंध असतात. नवरा बायको, काका काकू, बहीण भाऊ अशी विविध नाती असतात. ही नाती अनेकदा आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती होत असतात. तर अशीच एक कलाकार जोडी आज आपण पाहणार आहोत. हे दोघे ही सख्खे बहीण भाऊ असून ते मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत आहेत. चला तर पाहूया कोण आहेत हे सख्खे बहीण भाऊ.
स्टार प्रवाह वरील प्रसिद्ध मालिका “आई कुठे काय करते?” या मालिकेतील यश म्हणजेच अभिषेक देशमुख आणि फ्रेशर्स, मी तुझीच रे या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता देशमुख हे दोघे सख्खे भाऊ बहीण आहेत. हे दोघे ही अनेक विविध कार्यक्रमांमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. हे दोघे बहीण भाऊ मूळचे पुण्याचे आहेत. दोघे ही सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह असतात व आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. अनेक पोस्ट्स आणि विनोदी रिल्स शेयर करत नेटकऱ्यांचे मनोरंजन देखील करत असतात.
अभिषेक देशमुखने आर्कीटेक्चर मध्ये पुण्यामधील एल बी एच एस एस टी कॉलेज ऑफ आर्कीटेक्चर येथून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्याला कॉलेजपासूनच अभिनेता होण्याची इच्छा असल्याने त्याने लेखन, दिग्दर्शन, नाटकांमध्ये अभिनय करणे या गोष्टींवर कॉलेजपासूनच भर दिला. म्युझिकल शो पैघम, कर्वे बाय द वे आणि एकदा काय झाले ही नाटके अभिषेकची काही सर्वात लोकप्रिय कामे आहेत.
२०१५ मध्ये त्याने झी मराठीवरील “पसंत आहे मुलगी” या मालिकेत काम केले होते. होम स्वीट होम या चित्रपटात देखील तो झळकला होता. अभिषेक देशमुख हा विवाहित असून त्याच्या पत्नीचे नाव कृतिका देव आहे. कृतिका देव देखील अभिनेत्री असून तिने पानिपत या हिंदी चित्रपटामध्ये विश्वासराव पेशवे यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
अमृता देशमुख हिने पत्रकारिता आणि जनसंवाद या क्षेत्रात पदवी प्राप्त केली आहे. अमृताला पत्रकार व्ह्याचे होते आणि म्हणूनच ती या क्षेत्रात इंटर्नशिप करत असताना तिला पुढचं पाऊल, अस्मिता या मालिकांमध्ये काही छोट्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यानंतर तिचा अभिनय क्षेत्राकडे कल वाढला. ती चित्रपट आणि मालिकांमध्ये काम पाहत असतानाच तिला “तुमचं आमचं सेम असतं” या मालिकेमध्ये मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली. अमृताने अनेक जाहिराती देखील केल्या आहेत व सोबतच मुद्रित माध्यमांमधील जाहिरातींसाठी मॉडेलिंग देखील केले आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !