नवीन शासन नियमानुसार जमीन नावावर करता येणार फक्त १०० रुपयात, जाणून घ्या !

138

सध्याच्या काळात सोन्या चांदी सोबतच जमीनीच्या छोट्याशा तुकड्याला सुद्धा खुप महत्व आहे. सध्या जमीनसुद्धा करोडोच्या घरात विकल्या जात आहेत. अनेकदा वडिलोपार्जित जमिन आपल्या नावावर करायची असेल , किंवा घरातील इतर कोणत्याही सदस्याच्या नावावर करायची असेल तरी भरपुर पैसा खर्च करावा लागतो. या सर्व गोष्टींचा विचार करुन महाराष्ट्र शासनाने आता एक महत्वाचे पाऊल उचलले आहे.

या नियमांतर्गत कोणतीही शेतजमीन नावावर करायची असल्यास त्यासाठी पैसे देण्याची गरज नाही. आता फ्रिमध्ये तुम्ही एखादा जमीनीचा तुकडा तुमच्या नावावर करु शकता. पुर्वी वडिलोपार्जित जमीन मुलाकडे किंवा मुलीकडे हस्तांतरीत करायची झाल्यास काही शुल्क भरणे आवश्यक होते. आता महाराष्ट्र शासनाने काढलेल्या नव्या नियमांनुसार जमीनीच्या हस्तांतरणाच्या नव्या वाटणीपत्रासाठी आता केवळ १०० रुपये भरावे लागतील.

यासंदर्भात शासनाने एक परिपत्रक आणि जीआर काढण्यात आला आहे. पुर्वी वाटणीपत्राबाबत शेतकरी वर्गात एक संभ्रम होता. वडिलांकडुन मुलाकडे किंवा मुलीकडे तसेच आईकडुन मुलाकडे किंवा मुलीच्या नावावर जमीन करायची असेल तर शेतकऱ्यांना मोठी रक्कम भरावी लागायची त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक आर्थिक दडपण यायचे.

महाराष्ट्र शासनाने काढलेल्या नव्या नियमांद्वारे हिंदु कुटुंब पद्धतीने वडिलांच्या जमीनीचे मुलांसाठी वाटणी पत्र करत असताना महाराष्ट्रात महसूल अधिनियम 85 नुसार तहसीलदारांना संबंधित अधिकारी अधिकार देण्यात आलेले आहेत या अधिकाराचा वापर करून शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अधिकृत वाटणी पत्रक आणि विभाजन करून देण्यास कसलीही हरकत नसल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 85 नुसार येणाऱ्या रक्ताच्या नात्या मध्ये हस्तांतरणाची प्रकरणे तात्काळ निकाली काढावेत अशी सूचना शासनातर्फे तहसील यांना देण्यात आलेले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !