पोस्टाची ही आहे नवीन योजना, प्रधानमंत्री साहेबांनी देखील केली आहे यात गुंतवणूक, जाणून घ्या याबद्दल !

77

प्रत्येकजण छोटी मोठी गुंतवणुक करत असतो. तुम्हालापण जण छोटी मोठी गुंतवणुक करायची असेल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस हा उत्तम पर्याय आहे. विशेष म्हणजे या योजनेत खुद्द पंतप्रधान सुद्धा गुंतवणुक करतात. नरेंद्र मोदी यांनी लाइफ इंश्योरेंस आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणुक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जुन २०२० मध्ये त्यांनी ८ लाख ४३ हजार १२४ रुपयांची गुंतवणुक केल्याचे म्हटले जात आहे. लाइफ इंश्योरंस साठी त्यांनी १ लाख ५० हजार ९५७ रुपये प्रिमियम जमा केले होते. चला तर जाणुन घेऊ काय आहे ही स्किम.

नॅशलन सेव्हिंग सर्टीफिकेट – तुम्हाला जर जीरो रिस्क वर गुंतवणुक करायची असल्यास तुम्ही पोस्टात गुंतवणुक करु शकता. ही योजना पोस्टाच्या स्मॉल सेव्हींग स्किमचा भाग असल्यामुळे ही एक सुरक्षित स्किम आहे. या योजनेत देशाचे पंतप्रधानसुद्धा गुंतवणुक करतात.

कशी करावी गुंतवणुक – नेशनल सेविंग्स सर्टिफिकेट मध्ये पाच वर्षांचा मिनिमम लॉक-इन पीरिएड असतो. याचाच अर्थ गुंतवणुकीच्या पाच वर्षांनंतरच तुम्ही ते पैसे काढु शकता. NSC मध्ये तीन प्रकारे गुंतवणुक करु शकता.

सिंगल टाईप – या मध्ये तुम्ही स्वतःसाठी किंवा अल्पवयीन व्यक्तीसाठी गुंतवणूक करू शकता.

ज्वाइंट ए टाइप – या प्रकारात दोन लोक एकत्र येऊन गुंतवणुक करु शकतात.

ज्वाइंट बी टाइप – या योजनेत दोन लोक गुंतवणुक करु शकतात मात्र मॅच्योरिटीच्या वेळी ते पैसे एकाच गुंतवणुकदाराला दिले जातात.

किती रुपये गुंतवु शकता – पोस्टाच्या स्किममध्ये सध्या ६.८ टक्के व्याज दर आहे. या स्किममध्ये तुम्ही कमीत कमी १००० रुपयांची गुंतवणुक करु शकता. यामध्ये अधिकाधिक किती गुंतवणुक करावी यावर कोणतेही बंधन नाही.

इन्कम टॅक्समध्ये सुट – तुम्ही पण जर NSC मध्ये गुंतवणुक करत असाल तर इनकम टैक्स सेक्शन 80C च्या अंतर्गत दर वर्षी १.५ लाख रुपयांची गुंतवणुक केल्यावर टॅक्समध्ये सुट मिळु शकते. करपात्र उत्पन्नाच्या बाबतीत, एकूण उत्पन्नातून रक्कम वजा केली जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !