रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेला तुफान प्रतिसाद मिळतोय. पहिल्या २ पर्वांप्रमाणेच तिसऱ्या पर्वावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. पण सध्या मालिकेत शेवंता या लोकप्रिय व्यक्तिरेखेच्या जागी एक नवीन चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. मालिकेत सध्या अभिनेत्री कृतिका तुळसकर हि शेवंताची भूमिका साकारणार आहे. जाणून घेऊया कृतिका बद्दल.

कृतिका गेली १८ वर्षात थिएटर माध्यमात कार्यरत असून तिने अनेक नाटक आणि चित्रपटात काम केलं आहे. कृतिका एक नृत्यांगना आहे, ती कथ्थक विशारद आहे. प्रोफेशनली सायकॉलॉजिस्ट असलेली कृतिका आपली आवड जोपासण्यासाठी अभिनय क्षेत्राकडे वळली.

शेवंताची भूमिका साकारणे हा तिच्या अभिनय क्षेत्रामधील कारकिर्दीतला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट असून त्याविषयी बोलताना कृतिका म्हणाली, “रात्रीस खेळ चाले ही मालिका आणि त्यातील पात्र ही खूप लोकप्रिय असून प्रेक्षक त्यावर खूप प्रेम करतात. शेवंता ही भूमिका माझ्या वाट्याला आली असली तरी त्या भूमिकेच्या लोकप्रियतेकडे पाहता ही भूमिका साकारणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. मी अशा करते कि प्रेक्षकांना माझं काम आवडेल आणि ते मला शेवंता म्हणून स्वीकारतील.”

नवीन शेवंताला प्रेक्षकांकडून नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल यात शंकाच नाही. सध्या मालिकेत अजून एका नवीन व्यक्तिरेखेच्या एन्ट्रीमुळे मालिका रंजक वळणावर आली आहे. वच्छी हे पात्र पुन्हा एकदा मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत असून ती एका नवीन लुक मध्ये दिसतेय. आता या मालिकेने प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढवली आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *