जर तुम्हाला शेतीपासून चांगली कमाई करायची असेल तर असे पीक पिकवा ज्यात वर्षभरामध्ये चांगली मागणी असेल तसेच त्या पिकाला चांगली किंमत सुद्धा मिळेल. आज आम्ही तुम्हाला अशा पिकाबद्दल सांगणार आहोत ज्याची हिवाळ्याच्या दिवसात खूप चांगली मागणी असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोकरी पेक्षा या शेतीच्या व्यवसायातून तुम्ही जास्त पैसे कमवू शकता. विशेष म्हणजे या शेतीसाठी खुद्द केंद्र सरकार सुद्धा मदत करते. ही शेती म्हणजे आल्याची शेती. हे आले चहापासून भाजी , औषधांमध्ये वापरले जाते. चला तर जाणून घेऊ आल्याची शेती कशी करतात.

आल्याची शेती करण्यासाठी आल्याच्या पूर्वीच्या पिकाचे कंद वापरले जातात मोठ-मोठ्या आल्याच्या कंदांना दोन-तीन अंकुर येतील अशा प्रकारे ते तोडले जातात. पेरणीपूर्वी शेताची दोन-तीन वेळा नांगरणी केली जाते त्यामुळे माती भुसभुशीत होते. ते झाल्यावर शेतात शेणखत टाकले जाते त्यामुळे आल्याचे उत्पादन चांगल्या प्रकारे मिळते.

कशी केली जाते आल्याची शेती – आल्याची शेती ही प्राकृतिक पावसावर अवलंबून असते ही शेती स्वतंत्र तसेच पपई किंवा इतर मोठ्या पिकां सोबत सुद्धा केली जाते. एका हेक्‍टरमध्ये दोन ते तीन टन बिया रुजवल्या जातात. पाण्याचे छोटे छोटे पाट करून ही शेती करावी लागते. ज्या जमिनीत पाणी साचते तेथे आल्याची शेती करू नये. आल्यासाठी 6 ते 7 पीएच असलेले माती सर्वात योग्य असते.

आल्याची पेरणी करताना दोन ओळींमधील अंतर 30 ते 40 सेंटीमीटर आणि दोन रोपांमधील अंतर वीस ते पंचवीस सेंटिमीटर असावे. चार ते पाच सेंटीमीटर खोलीवर बिया पेरल्यावर त्यावर थोडीशी माती किंवा शेण खताने झाकून टाकावे. या शेतीला ठिबक पद्धतीने पाणी द्यावे त्यामुळे पाण्याची बचत सुद्धा होईल व खतपण सहज देता येईल.

आल्याचे पिक ८ ते ९ महिन्यात तयार होते. एका हेक्टरच्या लागवडीसाठी साधारण ७ ते ८ लाख रुपये खर्च येतो. एका हेक्टरमध्ये सुमारे १५० ते २०० क्विंटल आल्याचे उत्पादन घेतले जाते. सध्या आल्याचा बाजारभाव ८० ते १२० रुपये प्रतिकिलो इतका आहे. त्यामुळे एका हेक्टरमध्ये २५ लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. यामध्ये झालेला सर्व खर्च वजा केल्यास १५ लाखांचा फायदा होतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *