अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस सध्या मनी लॉं’ड्रीं’ग केस वरुन चर्चेत आहे. जॅकलिनला ८ डिसेंबरला इडीने चौकशीसाठी बोलवले आहे. सुकेश चंद्रशेखर आणि इतरांविरुद्ध गुन्हेगारी कट, फसवणूक आणि सुमारे 200 कोटी रुपयांची खं’ड’णी प्रकरणी तिची चौकशी केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जॅकलीन आणि सुकेश एकमेकांच्या जवळचे मित्र आहेत. सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तूही दिल्या आहेत. सुकेश चंद्रशेखरसोबत जॅकलिनचे नाव जोडले गेल्यापासुन तिच्या संपत्तीची चर्चा सुरू झाली. जॅकलीनच्या करिअरवर नजर टाकली तर तिने सोलो हिट्स असे काही मोजकेच चित्रपट केले आहेत, पण तरीही तिची संपत्ती करोडोंच्या घरात आहे.

करोडोच्या प्रोपर्टीची मालकिण आहे जॅकलीन – जॅकलिन गेली १२ वर्षे चित्रपटसृ़ष्टीमध्ये काम करत आहे. मिडीया रिपोर्टस् नुसार जॅकलिन कडे ७४ करोड रुपयांची प्रोपर्टी आहे. जॅकलिन एका चित्रपटासाठी ३ ते ४ करोड रुपये चार्ज करते. २०१९ मध्ये फोर्ब्स इंडिया जॅकलिनची वार्षिक कमाई ९.५ करोड रुपये असल्याचे सांगितले होते. यावर्षी तिचा नेटफिल्क्स वरिल ड्राइव्ह सिनेमा सोडल्यास कोणताच मोठी सिनेमा प्रदर्शित झालेला नाही.

याच वर्षा जॅकलिनने मुंबईत स्वताचे घर खरेदी केले. या घराची किंमत करोडोच्या घरात असल्याचे सांगितले जाते. पुर्वी जॅकलिन प्रियंका चोपडाच्या घरात भाड्याने राहायची त्यासाठी ती लाखो रुपये भाडे द्यायची. पण आता जॅकलिन तिच्या नव्या घरी शिफ्ट झाली आहे.

रेस्ट्रॉंरंटचा सुद्धा आहे बिझनेस – जॅकलिन कडे सध्या १० मोठ्या ब्रॅण्डच्या जाहिराती आहेत. त्यात बॉडीसोप , स्नॅ’प डी, वेगा. नोवा, कॅशियो लोटस, ड्रू’ल्स, वैन ह्यूजन आणि एचटीसी वन यांचा समावेश आहे. जॅकलिनचे लग्झरी कार चे कलेक्शनसुद्धा आहे. तिचा मुळ देश असलेल्या श्रीलंकेत दक्षिणी तटावर स्वताच्या मालकिचे द्वीप आहे. तिचा रेस्टोरंटचा बिझनेस असुन श्रीलंकेतील कोलोंबो येथे एक रेस्टोरंट आहे.

जॅकलिनने मिस युनिव्हर्स श्रीलंकाचा किताब पटकवला होता. चित्रपटसृष्टीत येण्यापुर्वी ती टीव्ही रिपोर्टर म्हणुन काम करायची. तिने २००९ मध्ये अलादिन चित्रपटातुन पदार्पण केले होते. त्यानंतर ‘म’र्ड’र 2’, ‘हा’उ’सफुल 2’, ‘रे’स 2’, ‘कि’क’ आणि ‘फ्ला’इं’ग जे’ट यांसारखे चित्रपट केले. याव्यतिरिक्त तिने झलक दिखलाजा सीझन ९ च्या परिक्षकेची भुमिका पार पाडली होती.

तिच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास ती बहरिनच्या प्रिन्स हसन बिन राशिद अली खलीफाला डेट करत आहे. या दोघांची भेट त्यांच्या एका कॉमन मित्राच्या पार्टीमध्ये झाली होती. सध्या मात्र तिचे नाव सुकेश चंद्र सोबत जोडले जात आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *