माणसांना नाना प्रकारच्या आजाराने ग्रासलेल असते. त्या आजारातुन बाहेर पडायला लोक वेगवेगळ्या औषधांचे सेवन करतात. औषध खरेदी करताना प्रत्येक वेळी आपण त्या औषधाची एक्सपायरी डेट बघुन मगच खरेदी करतो. पण असे का असाही प्रश्न काहींच्या मनात येतो. एक्सपायरी झाल्यावर ते औषध विषारी होते का कि त्या औषधाचा असर संपतो हे मात्र कळत नाही. याचेच उत्तर आज आम्ही तुम्हाला या लेखातुन देणार आहोत.

एक्सपायरी डेटची आवश्यकता – भारतात औषधे ही ड्रग्स एंड कॉस्मेटिक्स अॅक्ट १९४० आणि नियम १९४५ च्या अंतर्गत नियंत्रित केली जातात. तसेच या अंतर्गत औषधांवर एक्सपायरीचे शिक्के देखील मारले जातात. या नियमांनुसार औषधांवर एक्सपायरी डेट असणे अनिवार्य़ आहे. एक्सपायरी डेट म्हणजे ठराविक वेळेनंतर ते औषध विषारी होते असे नसुन ते औषध तयार करणारी कंपनी ठराविक कालावधीनंतर त्या औषधाचा प्रभाव किंवा सुरक्षेची गॅरेंटी देत नाही असा होतो.

एक्सपायरी औषधे खाल्याने होणारा त्रास – एक्सपायरी झालेली औषधे खाल्याने तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या औषधांचा जास्त प्रभाव होत नाही तसेच ती आजार कमी करण्याऐवजी वाढवण्याचा धोका जास्त संभवतो. त्यामुळे शरीरास आणखी धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय त्यामुळे आणखी वेगळ्या समस्या देखील उद्भवु शकतात.
या अशा औषधांमुळे तुमच्या लीव्हरवरदेखील परिणाम होऊ शकतो. तुमची पचनशक्ती बिघडु शकते. तसेच काही वेळेस त्या औषधांची एलर्जी देखील होऊ शकते. आणि महत्वाचे म्हणजे तुमची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे कोणतीही औषधे घेण्यापुर्वी नेहमी त्या औषधांची एक्सपायरी डेट तपासुन पहा. व स्वताच्या तब्येतीची काळजी घ्या.

एक्सपायरी झालेल्या औषधांचे काय करावे – ही औषधे कोणाच्याही हाताला लागणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावी. किंवा एखाद्या सिल बंद पॅकेट मध्ये टाकुन ती फेकु शकता. सिरप सारखी औषधे तुम्ही फ्लश करु शकता किंवा सिंक मध्ये फेकुन देऊ शकता.

चुकुन एक्सपायर झालेली औषधे खाल्यास काय करावे – शक्य़तो अनेक औषधांच्या कंपन्या त्यांच्या औषधांच्या एक्सपायरीमध्ये एक मार्जिन पिरीएड ठेवतात. म्हणजेच जर एखादे औषध २०२० मध्ये तयार झाले असेल आणि त्याची एक्सपायरी २ वर्षांनी म्हणजेच जानेवारी २०२२ ती असल्यास तिथे जुन २०२१ असा कालावधी टाकला जातो. त्यामुळे हे औषध चुकुन जरी कोणी खाल्ले तर त्याचा कोणाला त्रास होत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *