बॉलिवूड मधील सर्वात महागडे लग्न, नंबर ३ ने तर पाण्यासारखा पैसे उडवला !

86

सध्या सर्वत्र सोशल मीडियावर कॅटरिना कैफ आणि विकी कौशल च्या लग्नाची चर्चा आणि फोटो व्हायरल होत आहेत. दोघांनी त्यांच्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च केलेला दिसतो. लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च करणारे हे काही पहिले कपल नाही. या आधीही बॉलिवुडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी मोठ्या थाटामाटात राजेशाही अंदाजात लग्न केले आहे. चला तर आज आपण अशाच काही जोडप्यांबद्दल जाणुन घेणार आहोत.

१. दिपिका – रणवीर चे लग्न – दिपिका आणि रणवीरने २०१८ मध्ये एकमेकांशी विवाहगाठ बांधली. मिळालेल्या माहितीनुसार या दोघांच्या लग्नात ७७ करोड रुपये खर्च आला होता. इटलीमधील विला डेल बालबियानोमध्ये हा विवाहसोहळा पार पडला होता. तिथे राहण्यासाठी एका रात्रीची किंमत २५ लाख रुपये असल्याचे म्हटले जात होते.

२. कॅटरिना आणि विकी – कॅटरिना आणि विकीचा राजस्थानमध्ये शाही अंदाजात ९ डिसेंबरला विवाहसोहळा पार पडला. या लग्नात त्यांनी करोडो रुपये खर्च केले. हे लग्न बॉलिवुडच्या महागड्या लग्नांपैकी एक मानले जाते. त्यात कॅटरिनाने ७५ टक्के खर्च केल्याचे म्हटले जाते.

३. प्रियंका आणि निकचे लग्न – प्रियंका आणि निकने जोधपुर येथील उम्मेद भवन पॅलेस मध्ये लग्न केले. या लग्नात १०५ करोड रुपये खर्च आला होता. या पॅलेसमधील एका रात्रीचे भाडे ६४ लाख रुपये होते.

४.  अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे लग्न – ११ डिसेंबर २०१७ ला इटलीतील ‘बोरगो’ रेसॉर्ट मध्ये बॉलिवुड अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांचास विवाह संपन्न झाला. असे म्हटले जाते कि या लग्नात १०० करोड रुपये खर्च आलेला.

५. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचे लग्न – २२ नोव्हेंबर २००९ मध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी खंडाळ्यातील एका रिसॉर्टमध्ये लग्न केले. त्यावेळी या भव्य लग्नाला ५ करोड रुपये खर्च आला होता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !