अनेकांच्या घरात त्यांच्या दिवसाची सुरुवात ही चहा पिण्यापासुन होते. साधारणता चहा तयार झाल्यावर त्याचा गाळ टाकुन दिला जातो. पण तुम्हाला माहित आहे का या चहा पावडरचे अनेक फायदे सुद्धा आहेत. आज आम्ही तुम्हाला याच फायद्यांबद्दल सांगणार आहोत.
संसर्गापासून बचाव – चहाची पावडर ही अँटीऑक्सिडंट असते. किरकोळ जखमा किंवा घाव बरे करण्यासाठी त्याचा वापर करू शकतो. चहाची पावडर आपल्याला संसर्गा होण्यापासून वाचवते. दुखापत झाल्यावर किंवा जखमेवर चहा पावडर उकळवुन लावु शकता. उकळलेल्या चहाचे पाणी जखमेला लावु शकतो. हे तुम्हाला संसर्ग होण्यापासून वाचवते.
फर्निचर चमकवण्यासाठी – लाकडापासून बनवलेल्या फर्निचरला चमक देण्यासाठी आपण चहा पावडरचा वापर करू शकतो. त्यासाठी वापरलेली चहाची पावडर पुन्हा पाण्यात उकळून बाटलीत भरून ठेवा. या पाण्याने लाकडी फर्निचर स्वच्छ केल्याने त्याला नवीन चमक येते.
चणे बनवण्यासाठी – तुम्ही वापरलेली चहाची पावडर वाळवा. काबुली चणे उकडताना या चहाच्या पावडरची पुडी बनवून त्यात टाका. त्यामुळे त्या चण्यांना सुरेख रंग येईल तसेच त्यांची चव सुद्धा चांगली येईल.
कंडीशनर म्हणुन वापर – चहाची पावडर तुम्ही केसांना कंडीशनर म्हणुन देखील वापरु शकता. केसांना चमक येण्यासाठी चहा पावडर खुप फायदेशीर ठरते. त्यासाठी वापरलेली चहा पावडर पुन्हा धुवुन ती उकळवा. ते पाणी केस धुवण्यासाठी वापरा. हे तुम्ही नियमित केलात तर तुमच्या केसांना नक्कीच चमक येईल.
भांडी चमकवण्यासाठी – वॉशिंग पावडरमध्ये चहाची पावडर मिसळा आणि भांडी साफ करा, तुमची भांडी चमकू लागतील.
खत म्हणुन वापरा – झाडांच्या वाढी साठी आपण त्यांच्या मुळात वेगवगळ्या प्रकारचे खत टाकत असतो. त्यामुळे वापरलेली चहा पावडर पुन्हा धुवुन स्वच्छ करा. आणि ती मातीत मिसळा. त्यामुळे झाडांची लवकर वाढ होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !