केळे हे एक असे फळ आहे जे कोणत्याही सीजनला उपलब्ध असते. शिवाय त्याचे फायदे देखील भरपुर आहेत. विशेषता थंडीच्या दिवसात केळ्याचा शरीराला खुप फायदा होतो. थंडीत केळे खाल्ल्यास आजारी पडायला होते असा काहींचा चुकीचा गैरसमज असतो. केळ्यात विटामिन सी, डाइटेरी फाइबर आणि मैग्नीज़चे प्रमाण खुप असते. तसेच त्यात विटामिन बी६ सुद्धा असते. तसेच ते फॅट फ्रि आणि कोलेस्ट्रोल फ्रि असते. केळ्याला उर्जेचा स्त्रोत म्हटल्यास हरकत नाही. आज आम्ही तुम्हाला केळे खाल्यास कोणते फायदे होतात ते सांगणार आहोत.

1. विटामिन बी6 – केळे हे विटामिन बी6 चे मोठे स्त्रोत आहे. केळ्यातुन मिळणारे विटामिन बी6 शरीरात सहज मिसळुन जाते. जर आपण दिवसाला मध्यम आकाराचे एक केळे खातो तर ते संपुर्ण दिवसभरात २५ टक्के विटामिन बी6 च्या गरजांची पुर्तता करते. विटामिन बी6 शरीरात लाल रक्ताच्या कणांची निर्मिती करते. तसेच ते कार्बोहायड्रेटस् आणि फॅटस् ला उर्जेमध्ये रुपांतरीत करते. गर्भवती महिलांसाठी विटामिन बी6 खुप महत्वाचे असते.

2. विटामिन सी – शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला विटामिन सी ची आवश्यकता असते. साधारणपणे आंबट पदार्थ किंवा संत्रे हे विटामिन सीचे स्त्रोत मानले जातात. एक मध्यम आकारचे केळे दिवसाला १० टक्के विटामिन सी मिळवुन देते. तसेच त्याच्यामुळे शरीरातील आयरन मिसळुन घेण्यास सुद्धा मदत होते.

3. मैग्नीज- केळ्यात असलेले मैग्नीज शरीर आणि त्वचेसाठी फायदेशीर असते. मैग्नीज आपल्या त्वचेला आणि सेल्सला फ्रि रेडीकल डॅमजपासुन वाचवतात.

4. पोटेशियम – केळे हे ह्रदयासाठी चांगले मानले जाते. केळ्यात असलेले पोटेशियम ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करतात. तसेच केळ्यातच सोडीयमची मात्रा कमी असते. त्यामुळे कमी सोडियम आणि जास्त पोटेशियमचे मिश्रण ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करतात.

5. एनर्जी लेव्हल – केळ्याचे सेवन केल्यास एनर्जी लेव्हल लगेच वाढल्याची जाणवते. केळ्यात सूक्रोस, फ्रुक्टोस आणि ग्लुकोज असते. जे शररीला फॅट फ्रि आणि कोलेस्ट्रोल फ्रि उर्जा देतात. केळ्याचे सेवन कोणत्याही वयातील व्यक्ती करु शकतात मात्र जे अॅथलिट असतात तसेच लहान मुलांच्या नाश्त्यात केळ्याचा वापर होणे आवश्य आहे. तसेच शरीरातील पाचन क्रिया केळयामुळे सुरळित होते.

केळे सेवन करण्याची योग्य वेळ – ज्या केळ्यावर काळे डाग आलेले असतात ते केळ पुर्ण पणे पिकलेले असते. त्यात स्टार्चची पुर्ण मात्रा असते. तसेच ते पचण्यासाठी सुद्धा हलके असते. त्याचे सेवन केल्यास एनर्जी लवकर बुस्ट होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *