गेले काही दिवस लग्नाचे वय किती असावे याबाबत सर्वत्र गदारोह माजला आहे. अनेकदा लहान लहान गावाच्या ठिकाणी पैंशापायी ,परिस्थितीमुळे किंवा प्रथा परंपरांच्या नावाखाली बाल्यावस्थेत मुलांचे लग्न लावले जाते. त्यामुळे त्यांच्या बाबतीत अनेक तक्रारी कानावर येत असतात.
हा मुद्दा ताजा असतानाच पंजाबमधील हरियाणा हायकोर्टाने २१ वर्षांच्या खालील मुलांना (पुरुषांना) लग्न करता येणार नाही मात्र ती मुले १८ वर्षे किंवा त्याहुन अधिक वयाच्या मुलींसोबत किंवा महिलांसोबत त्यांच्या संमत्तीने लिव्ह इन मध्ये राहु शकतात असे सांगितले आहे.
हायकोर्टाचा हा निर्णय मे २०१८ च्या सुप्रिम कोर्टातील निर्णयाशी संबंधित आहे. त्यावेळी निर्णयात सांगितलेले कि कोणतेही तरुण जोडपे लग्न न करतासुद्धा एकत्र राहु शकतात.
पंजाबमध्ये एक राहणारे जोडपे लिव अन रिलेशनशिप मध्ये राहत होते मात्र त्यांनी त्यांच्या परिवारापासुन सुरक्षा मिळावी यासाठी कोर्टात याचिका दाखल केली. त्या दोघांचेही वय १८ वर्षांहुन अधिक होते. मुलगा १८ वर्षांचा असला तरीही हिंदु मॅरेज अॅक्ट नुसार तो वयाची २१ वर्षे पुर्ण झाल्याशिवाय लग्न करु शकत नव्हता. या दोघांच्या परिवाराकडुन त्यांच्या जीवाला धोका असल्याचे त्यांचे म्हणणे होते.
प्रत्येक व्यक्तीच्य़ा स्वातंत्र्य आणि जीवनाची रक्षा करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे हायकोर्टाच्या सुनावणी दरम्यान न्यायमुर्ती हरनेश सिंह गिल यांनी सांगितले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !