२०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकी पुर्वी केंद्रीय मंत्रीमंडळाने एक विधेयक पास केले आहे. या विधेयका अंतर्गत मतदाराला त्याचे वोटर आयडी कार्ड आधार कार्डला लिंक करावे लागणार आहे. मतदान करताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी हे विधेयक असणार आहे.

पुर्वी एखादी व्यक्ती गावी किंवा शहरात राहुन त्याचे वोटींग कार्ड बनवु शकत होती. त्यामुळे निवडणुकीवेळी ती व्यक्ती दोन वेळा वोट करण्यासाठी सक्षम असायची. मा्त्र आता आधार कार्डला व्होटींग आयडी लिंक झाल्यावर असे होऊ शकत नाही. निवडणुकीत पारदर्शकता पाहण्यास मिळेल. आज आम्ही तुम्हाला याच प्रक्रियेबद्दल सांगणार आहोत.

आधारकार्डला व्होटरआयडी लिंक करण्यासाठी राष्ट्रीय मतदार पोर्टलची वेबसाइट https://voterportal.eci.gov.i/ वर जा.

त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर , इमेल आयडी आणि व्होटर आयडी नंबर आणि पासवर्डचा वापर करुन लॉगइन करावे लागेल.

आता तुमच्या स्क्रिनवर एक नवीन पेज ओपन होईल त्यावर तुम्ही तुमचे नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव यांसारखी वैयक्तिक माहिती भरा.

माहिती भरुन झाल्यावर सर्च बटणावर क्लिक करा. जर तुम्ही दिलेली माहिती बरोबर असेल तर ती स्क्रिनवर दिसेल.
त्यानंतर उजव्या बाजुस असणाऱ्या फिड आधार नंबर या ऑप्शनवर क्लिक करा.

ते झाल्यावर तुम्हाला आधार कार्ड, आधार संख्या आणि मतदार ओळख क्रमांक या सर्व गोष्टी लक्षपुर्वक भराव्या लागतील.
दिलेली माहिती एकदा नीट लक्षपुर्वक वाचा आणि त्यानंतर सबमिटवर क्लिक करा.
त्यानंतर तुमची माहिती स्विकारली जाईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *