अखेर सुश्मिता सेनचे झाले ब्रेकअप, बॉयफ्रेंड गेला सुश्मिताचे घर सोडून !

84

बॉलिवुडमध्ये अनेक कपल आहेत. अनेक जण त्यांना पाहुन त्यांचे कपलगोल सेट करत असतात. त्यांचे क्युट फोटो पाहुन त्यांच्यासारखे राहण्याचा प्रयत्न करतात. अशीच अभिनेत्री सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांची जोडी सुद्धा प्रेक्षकांना खुप आवडायची. दोघेही सोशल मीडियावर अनेकदा त्यांचे प्रेम व्यक्त करायचे. दोघेही अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असायचे. पण सुष्मिता सेन आणि रोहमन यांचा ब्रेकअप झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते. त्यामुळेच त्या दोघांचा ब्रेकअप झाला. इटाइम्सने दिलेल्या माहितीनुसार सुश्मिताने रोहमन सोबतची सर्व नाती तोडली आहेत. त्यामुळे रोहमनने सुद्धा सुश्मिताचे घर सोडले आहे. सध्या तो त्याच्या मित्राच्या घरी राहत आहे. ते दोघे ही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसायचे. रोहमन तिच्याच घरी राहयचा.

तुम्ही दोघे लग्न कधी करणार असा प्रश्न अनेकदा त्यांच्या फॅन्सकडुन विचारला जायचा. पण आता या प्रश्नाचे उत्तर आता कायमसाठी निरुत्तरीतच राहणार असल्याचे दिसते.

सुश्मिता आणि तिच्या मुली म्हणजे माझा परिवार…रोहमन – या जोडप्याचे लवकरात लवकर लग्न व्हावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. काही दिवसांपुर्वी एका इंटरव्ह्युमध्ये रोहमनने सांगितले होते की सुश्मिता आणि त्याच्या दोन्ही मुली या माझा परिवार आहे. मी तिच्या दोन्ही मुलींसाठी कधी कधी वडिलांप्रमाणे असतो तर काही वेळेस मी त्यांचा मित्र असतो. त्यांच्यासोबत भांडतो सुद्धा.तुम्ही लग्न कधी करणार या प्रश्नावर रोहमन म्हणाला की सध्या सुश्मिता तिच्या वेबसिरिजच्या सक्सेस साजरे करत आहे. लग्नाचे पुढे पाहु.

या वर्षाच्या सुरवातीला सुद्धा या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा होत होत्या. मात्र तरही त्यानंतर ते दोघेही अनेकदा एकत्र दिसल्याने त्या अफवा असल्याचे म्हटले गेले. सुश्मिताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर नुकतीच ती आर्या २ मध्ये दिसली होती. त्यातील तिचा अभिनय वाखडण्या जोगा होता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !